उदगीर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा ६६वा वाढदिवस प्रदेश संघटक सचिव भरतभाऊ चामले यांच्या संकल्पनेतून अजितदादांच्या जन्मदिनी लावलेल्या झाडांचा ५०० झाडे लावण्यापेक्षा ५० झाडे जगवलेले कधीही चांगले, हा विधायक मानस ठेवून भरतभाऊ चामले यांनी दादांच्या गतजन्मदिनी लावलेल्या झाडांचा वाढदिवस दादांच्या वाढदिवसा सोबत एम.ए.बी. अंध विद्यालयातील बाळ गोपाळांना, कर्मचाऱ्यांना व पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन साजरा केला.
भरतभाऊ चामले हे अजित दादांचे निष्ठावंत कार्यकर्ते असून ते त्यांचे निकटवर्तीय आहेत. ते दादांचा प्रत्येक वाढदिवस विविध विधायक व समाज उपयोगी कार्यक्रमांनी करतात. भरत चामले यांना सहजच २०१७ साली अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एम. ए. बी. अंधविद्यालयात वृक्षारोपण केलेली आठवण झाली आणि त्यांनी लावलेली झाडं त्यांचा वाढदिवस साजरा करावा. अशी आपसूक कल्पना त्यांच्या मनात आली. आणि त्यांनी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून बोलावून घेतले. अंधविद्यार्थी, सर्व कर्मचारी व पार्टीचे पदाधिकारी यांच्या समवेत अंधबालकांच्या हस्ते केक कापून दादांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर दादांच्या गतजन्मदिनी लावलेल्या झाडांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर सर्व अंधबाळ-गोपाळांसोबत सर्व पदाधिकारी, कर्मचारी यांनी सहभोजन केले. अंध बाळ गोपाळांना मैदानी खेळ खेळता यावेत यासाठी त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी बॅट्स आणि बॉल्सची भेट दिली.
यावेळी वसंतराव सोनकांबळे संचालक खरेदी विक्री संघ, बाबासाहेब काळे पाटील संचालक खरेदी-विक्री संघ, मधुमती कनशेट्टी शहराध्यक्षा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उर्मिलाताई वाघमारे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रदीप जोंधळे जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नागनाथ बंडे सामाजिक कार्यकर्ते, बाळासाहेब नवाडे विकास संस्था चेअरमन, बालाजी परगे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, विजय येडले, गोपाळ चामले, एम. ए. बी. अंधविद्यालयाचे व्ही. एम. रोटे , एस. बी. भंडारे, एन. सी. डोमेराव , एम. एन. तुकडे, पी. झेड. गव्हाणे, विशाल देवरसे, नीलकंठ सुरनर, राजू राजुरे, बिभिशन जाधव, लक्ष्मीबाई हेमनर आदी उपस्थित होते.
