उदगीर (प्रतिनिधी) चापोली येथे आयोजित 'ब' विभागीय आंतर महाविद्यालयीन बुध्दिबळ पुरुषांच्या स्पर्धेत शिवाजी महाविद्यालय उदगीरचा संघ उपविजयी ठरला. संघाचा कर्णधार मोरे सुरज यांनी नेतृत्व केले तर गिरी अवधूत, कुलकर्णी श्रीकांत, काटेकर पद्माकर, बिरादार पवन , गोणे साई या खेळाडुंचा समावेश होता. या महाविद्यालयातील माजी विद्यार्थी रुपेश तुकडे, राजेश बिरादार, आशिष पारसेवार, हुलसुरे तानाजी, गुंजरगे राष्ट्रभुषण, बोडके आकाश यांनी बुध्दिबळ खेळासाठी खूप मोठे योगदान देऊन अनेक पारितोषिके संपादन केली. या माध्यमातून अनेक राष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले. ही परंपरा कायम ठेवत खेळाडूंनी आपली उज्ज्वल कामगिरी केली. खेळाडूच्या या यशाबद्दल खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देणारे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर ,उपाध्यक्ष माधवराव पाटील, सचिव पांडुरंग शिंदे, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील व इतर कार्यकारिणी सदस्य, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.एम. मांजरे महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.गिरी आर.पी , प्राध्यापक कार्यरत कर्मचारी , शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.क्रीडा विभागाचे संचालक प्रा. नेहाल खान व प्रा. गजानन माने यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
