उदगीर (वार्ताहर) सुर्यकांत शिरसे यांनी ग्रंथालय चळवळीत प्रभावीपणे कार्य केले आहे . बालशिक्षणासाठी ते महत्वाचे पाऊल ठरते, असे मत शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ पाटील यांनी व्यक्त केले . लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक सुर्यकांत शिरसे यांच्या षष्ठ्यब्दीपुर्ती निमित्ताने त्यांच्या सत्कार करण्यात आला . अध्यक्षस्थानी मसापच्या उदगीर शाखेचे अध्यक्ष व साहित्यिक धनंजय गुडसूरकर हे होते . प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक संजय मोघेकर उपस्थित होते . श्रीमती रुपा बासरकर यांनी प्रास्तविक केले . ग्रामीण भागात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचनालयांची स्थापना करून शिरसे यांनी वाचन वाढविण्यासठी केलेले प्रयत्नही कौतुकास्पद आहेत, असे मत निळकंठ पाटील यांनी पुढे बोलताना व्यक्त केले .
सुर्यकांत शिरसे यांनी ग्रंथालय चळवळी सोबतच प्रकाशन व साहित्य चळवळीत प्रभावीपणे कार्य केले आहे. असे प्रतिपादन साहित्यिक धनंजय गुडसूरकर यांनी यावेळी अध्यक्षीय समारोपात व्यक्त केले . संजिवनी ददापूरे यांनी आभार मानले .
