रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा पदाग्रहण सोहळा येथील मोरया मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर बोलत होते. व्यासपीठावर रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३२ चे २०२७-२८ चे नियोजित प्रांतपाल क्षितिज झावरे, सहायक प्रांतपाल चंद्रशेखर मुळे, रोटरॅक्ट क्लबच्या प्रांत प्रतिनिधी केतकी कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे नुतन अध्यक्ष प्रशांत व दर्शना मांगुळकर व उपाध्यक्ष मोतीलाल व मीरा डोईजोडे, सचिव विक्रम व विजया हलकीकर, प्रोजेक्ट चेअरमन विजयकुमार पारसेवार यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात रोटरी क्लबच्या वतीने सुरु करण्यात आलेला पहिला उदगीर भूषण पुरस्कार शंकरलिंग महाराज मठ संस्थांनचे मठाधीश ह.भ.प. सुखदेव स्वामी महाराज यांना प्रदान करण्यात आला.
पुढे बोलताना ह भ प गहिनीनाथ महाराज यांनी स्पष्ट केले की, चार चांगली माणसे एकत्र आले की, समाजासाठी चांगले काम होत असते, हे रोटरीच्या कार्यातून सिद्ध झाले आहे. पोलिओ निर्मूलनाच्या कार्यात रोटरी क्लबचे योगदान मोठे असल्याचे गौरवोदगारही यावेळी ह.भ.प. औसेकर महाराजांनी काढले.
यावेळी बोलताना क्षितिज झावरे यांनी रोटरीच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती सांगून उदगीरचा रोटरी क्लब आगामी वर्षात चांगले काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी सहा. प्रांतपाल चंद्रशेखर मुळे, रोटरॅक्ट प्रतिनिधी केतकी कुलकर्णी, उदगीर भूषण पुरस्कार मूर्ती ह.भ.प. सुखदेव स्वामी महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले. मावळत्या अध्यक्षा सरस्वती चौधरी यांनी प्रास्ताविक केले. मावळत्या सचिव ज्योती चौधरी यांनी मागील वर्षाचा आढावा सादर केला. नुतन अध्यक्ष प्रशांत मांगुळकर यांनी आगामी वर्षाभरात रोटरी क्लबच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय विशाल तोंडचिरकर यांनी करून दिला.उदगीर भूषण पुरस्कार मानपत्राचे वाचन रविंद्र हसरगुंडे यांनी केले. सुत्रसंचालन श्रीपाद सिमंतकर व विशाल जैन यांनी केले. आभार नुतन सचिव विक्रम हलकीकर यांनी मानले. कार्यक्रमास रोटरी क्लबचे ईश्वर बोरा(अहिल्यानगर), रविंद्र बनकर (लातूर), अनिल चवळे व कपील बिरादार (अहमदपूर), रमेश अंबरखाने, डॉ. संग्राम पटवारी, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, सागर महाजन, किशोर पंदीलवार, महानंदा सोनटक्के, प्रा. मंगला विश्वनाथे, सुनीता मदनुरे, प्रा. सुनीता चवळे, कीर्ती कांबळे, संतोष फुलारी, प्रमोद शेटकार, ॲड. विक्रम संकाये, गजानन चिद्रेवार, पवन मुत्तेपवार, ॲड. मंगेश साबणे, राहुल मुचेवाड, सुधीर जाधव, गोपाळ मुक्कावार, मल्लिकार्जुन चिल्लरगे, व्यंकट कणसे, सुदर्शन मुंडे, डॉ. जगदीश येरोळकर, धनाजी मुळे, जगदीश बाहेती, लक्ष्मीकांत चिकटवार, अनिल मुळे, भागवत केंद्रे, रामदास जळकोटे, सुधीर जगताप, संतोष तोडकर, कमलेश पेठे, राजेश महाजन, मिलींद मुक्कावार, बिपीन पाटील, अभिजित पटवारी, आशिष अंबरखाने, रमेश निजवंते, डॉ. संतोष बिरादार, ज्योती स्वामी, गणेश तोलसरवाड, अजय आंबेसंगे, निशांत धवलशंख, डॉ. योगेश बिरादार, राम सोनटक्के, सुमीत मुर्किकर, जगदीश चौधरी, उदय धुर्वे, श्रीनिवास चंडेगावे सह शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
