उदगीर (एल .पी .उगीले) श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील रसायनशास्त्र विषयाच्या प्रा. सीमा गिताराम मेहत्रे यांची उदगीर शाखेच्या मराठी विज्ञान परिषदवर अजिव सभासद म्हणून निवड झाली आहे.
प्रा. सीमा मेहत्रे या रसायनशास्त्र विषयात सेट परीक्षा पास आहेत. त्यांची पीएचडी सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या मनात वस्तुस्थिती आणि नैसर्गिक घटनांकडे चिकित्सक आणि तर्कशुद्ध दृष्टीने पाहण्याची वृत्ती जोपासण्यासाठी त्या विविध उपक्रम राबवतात. विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून देतात, म्हणून त्या विद्यार्थी प्रिय प्राध्यापिका आहेत. विज्ञानाने उद्योग आणि तंत्रज्ञानाला नवी दिशा दिली आहे. नवीन मशीनरी, उत्पादन प्रक्रिया आणि माहिती तंत्रज्ञानामुळे कामाच्या पद्धतींमध्ये सुधारणा झाली आहे, तसेच उत्पादन क्षमता वाढली आहे. विज्ञानाने शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन दिले आहे. नवीन गोष्टी शिकणे आणि नवीन शोध लावणे विज्ञानामुळे शक्य झाले आहे. या पदावरुन त्या नक्कीच विज्ञानाचे विचार समाजात व विद्यार्थ्यांत पोहचविण्यासाठी कार्य करतात.
प्रा. सीमा मेहत्रे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड मराठी विज्ञान परिषद शाखा उदगीरच्या सभासद पदी झाली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन प्राचार्य वसंत कुलकर्णी, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, विभाग प्रमुख प्रा. प्रदीप कोठारे, संतोष चामले, विलास शिंदे, एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, उज्वला वडले, प्रा. शिवाण्णा गंदगे यांनी केले आहे.
