.
कासार सिरसी (बालाजी मिलगीरे)
निलंगा तालुक्यातील कासार शिरशी येथे जुन्नर मतदार संघाचे आमदार शरद सोनवणे यांच्या विरुद्ध निषेध व्यक्त करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच आ. सोनवणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
जुन्नर मतदार संघाचे आ. शरद सोनवणे यांनी मागील दोन दिवसा खाली प्रसार माध्यमाशी बोलताना त्याची जीभ घसरली आणि बेरड रामोशी आणि पारधी समाजाबद्दल आपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून पारधी समाज, बेडर बेरड रामोशी समाज संपूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून तीव्र प्रतिक्रिया आणि जाहीर निषेध व्यक्त करत आहेत. त्याला प्रतिसाद म्हूणन कासार सिरसी या परिसरातील सर्व समाज बांधव एकत्रित येऊन शहराच्या मुख्य मार्ग वाडी - कासार शिरशी रस्ता ते शिवाजी चौक या मार्गाने भव्य मोर्चा काढत आ. सोनवणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. संबंधित आमदारावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन येथील पोलीस निरीक्षक प्रताप गर्जे यांना देण्यात आले.
यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष भास्कर पाटील, राज्य सरचिटणीस बालाजी मिलगिरे मराठवाडा युवा प्रमुख मंगेश जमादार वाडी, कासार शिरशीचे सरपंच महेश मंडले,औसा तालुका युवक अध्यक्ष रायाप्पा मंडले, निलंगा तालुका अध्यक्ष सायबा कानडे, युवक प्रचार स्टार प्रमुख बालाजी फुगाके, कायदेशीर सल्लागार ॲड. दत्तात्रेय भोसले, नामदेव मंडले, बाळाप्पा गुंजले, पिराजी मिलगिरे, मारुती पाटील, लहू रेवणे,मेघराज भोसले, लक्ष्मण ममाळे, दयानंद रेवणे, दिलीप भोसले, संतोष पाटील, सिद्धार्थ पोगाके, दत्ता पोगाके अन्य समाजबांधव मोठ्या संख्याने उपस्थितीत होते.
