Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उमरगा परिसरातील वैदुंना वैद्यकी प्रमाणीकरणाचे मार्गदर्शन- शिवाजी महाविद्यालयाचा पुढाकार

 

     मुरुम (प्रतिनीधी) औषधी वनस्पतींचा पारंपारिक पद्धतीने वापर मनुष्य फार पूर्वीपासून करीत आहे. या ज्ञानाची नोंद झाली तर ते अनेक पिढ्यांसाठी कामी पडते. पण शास्त्रीय पद्धतीने नोंद कशी ठेवावी? याचे मार्गदर्शन त्यांना मिळत नाही. त्यामुळे हा अमूल्य ज्ञानठेवा नष्टही होऊ शकतो. त्याचे संवर्धन करण्याच्या हेतूने वारसा या संस्थेसोबत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने सामंजस्य करार केला असून त्याचा परिसरातील सर्व वैदूंना निश्चित उपयोग होईल, असे मत कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ. संजय अस्वले व्यक्त केले. 

लोकवनस्पति आणि पारंपरिक ज्ञानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना व समाजाला समजून सांगितला पाहिजे. या उदात्त हेतूने श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या आयक्यूएसी, वनस्पतीशास्त्र विभाग, वारसा-एथनिक नॉलेज हेरिटेज सोसायटी, अंजनगाव सूर्जी जि. अमरावती, श्रीमती राधाबाई सारडा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंजनगाव सुर्जी, अमरावती (महाराष्ट्र) आणि ट्रान्स-डिसिप्लिनरी हेल्थ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ (TDU), बेंगळुरू यांच्या संयुक्त विद्यमाने, “वैदू परंपरेचे संवर्धन व प्रमाणीकरण" या विषयावर ऑनलाइन राष्ट्रीय एक दिवसीय  कार्यशाळा दि. १८ जुलै २०२५ ला संपन्न झाली.


या एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयच्या विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यासमवेत धाराशिव, लातूर, सोलापूर, या जिल्ह्यातील एकूण २४ वैद्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. वैदुंचा परिचय मेळाव्या सोबतच वनस्पतींची ओळख, लागवड, औषध निर्मिती प्रक्रिया, वैद्य म्हणून शासकीय पातळीवरून प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया यावर सविस्तर मार्गदर्शन डॉ. एस. एच. पाटील (IFS Retd.) अध्यक्ष, जैवविविधता मंडळ, महाराष्ट्र राज्य, डॉ. दिनेश खेडकर अध्यक्ष, वनस्पतीशास्त्र अभ्यासमंडळ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. प्रभा भोगांवकर-अध्यक्ष, वारसा: एथनिक नॉलेज हेरिटेज सोसायटी, डॉ. प्रकाश बी. एन.- सहयोगी प्राध्यापक, TDU, बंगलोर, डॉ. प्रियंका सरकार- प्रकल्प व्यवस्थापक, PAD विभाग, QCI, नवी दिल्ली, डॉ. देवयानी शर्मा- अध्यक्ष, ग्रीन कॅनोपी फाउंडेशन, रायपूर, छत्तीसगड, सौ. हर्षा भुवन-शरयू फार्मास्युटिकल्स, अकोला आदींनी केले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी भारत शिक्षण संस्थचे अध्यक्ष श्री अमोल मोरे, उपाध्यक्ष श्री अश्र्लेश मोरे, यांनी प्रोत्साहित केले.

या मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या वैदुंचा यथोचित गौरव वारसा संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय अस्वले, उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ पद्माकर पिटले, प्रभारी प्राध्यापक डॉ. अशोक पदमपल्ले, समन्वयक डॉ विनोद देवरकर, सहसमन्वयक डॉ. आशा शिंदे, डॉ. व्यंकट सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभ सोहळ्याचे सूत्रसंचलन डॉ. मनोरंजना निर्मळे यांनी केले तर डॉ. आशा शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.