उदगीर (प्रतिनिधी) उदगीर येथील वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय मोदी सेवा समिती चे तालुकाध्यक्ष डॉ. शरदकुमार तेलगाने आणि शहराध्यक्ष निलेश हिपळगे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बसवराज डावळे, मनोहर लोहारे, सुधाकर नाईक, अशोक तोंडारे, ॲड. राजकुमार उस्तुरे, श्रीकांत पांढरे, पप्पू डांगे, उमाकांत द्दाढे, अमरनाथ मुळे, सुभाष शेरे, प्रा. महेश धोंडीहिप्परगेकर, पप्पू सूर्यवंशी, प्रकाश आंबेसंगे, कल्याणी लाला, रवींद्र टोम्पे, बाळू वैजापुरे, सूर्यभान चिखले, शिरीष जोशी, प्रकाश कोरे, विश्वनाथ बिरादार, मनमथ मुळे, सुखानंद मठपती, महादू बिरादार, शिवशंकर बापटले, मनोज गवारे, निलेश बिरादार इत्यादी मान्यवरासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना डॉ. शरद कुमार तेलगाणे यांनी स्पष्ट केले की, समाजाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, याची जाण ठेवून आपण समाजासाठी काही केले पाहिजे. या भावनेने राष्ट्रीय मोदी सेवा समिती काम करणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अनेक लोक कल्याणकारी योजना राबवलेल्या आहेत, असे असले तरीही अनेक योजना खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाहीत. हे दुर्दैव म्हणावे लागेल, त्यासाठी राष्ट्रीय मोदी सेवा समिती च्या माध्यमातून कार्यकर्त्याची एक फळी उभा करून जनजागृती आणि योजनांची माहिती लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची साखळी निर्माण करण्याची जबाबदारी आता आमच्यावर आलेली आहे. पक्षश्रेष्ठींनी मोठ्या विश्वासाने ही जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे. तो विश्वास सार्थ करून उदगीर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे कार्य निश्चितच उल्लेखनीय राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
