येथील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस पक्षाचे युवा नेते श्रीकांत पाटील यांच्या कार्याची ओळख समाजाला व्हावी, तरुणांमध्ये समाजसेवी प्रवृत्ती निर्माण व्हावी अशा उदात्त्य हेतूने तरुणांनी एकत्र येऊन श्रीकांत पाटील मित्र मंडळाची स्थापना केली आहे. या मित्र मंडळाचा पदग्रहण सोहळा वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने श्रीकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.समाजासाठी काहीतरी चांगले करण्याच्या प्रेरणेतून श्रीकांत पाटील मित्रमंडळाची स्थापना अध्यक्ष सचिन वाघमारे यांच्या पुढाकारातून व मित्र मंडळातील सर्व पदाधिकारी यांच्या संमतीने स्थापन करण्यात आले. या मंडळाचा उद्देश शिक्षण, पर्यावरण, महिला व युवक सक्षमीकरण, शेतकरी व गोर-गरीबांसाठी उपयुक्त योजना राबवणे, शेतीसंबंधी मार्गदर्शन करणे, स्वयंरोजगार निर्मितीसाठी पुढाकार घेऊन योजना प्रत्यक्ष राबवणे आदी क्षेत्रात कार्य करणे हा आहे.युवक-युवतींना सक्षम नागरीक म्हणून घडवणे, तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवणे, हे मंडळाचे मुख्य ध्येय आहे. नुकताच संपन्न झालेल्या पदग्रहण सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन श्रीकांत पाटील होते, तसेच प्रमुख पाहुणे रील्स स्टार सचिन पंडित, शिवराज पाटील ,प्रा.डाॅ. दत्तात्रय मोरे, काशिनाथ स्वामी, प्रा. दत्तात्रय मोरे, मल्लिकार्जुन स्वामी,संतोष स्वामी, शरद खांडेकर, हक्कानी , ॲड. अख्तार , राजेंद्र स्वामी,कंजे , प्रा.सुगावकर,प्रा.ज्ञानेश्वर मुसळे, संदीप चिखले,महेश नवाडे, डी.डी बिरादार , विजयकुमार सुवर्णकार, अशोक औटे, मुन्ना सूर्यवंशी, विशाल रंगवाळ, मिलिंद शेल्हाळकर, प्रभाकर सूर्यवंशी, अमोल राजगुरू, अरविंद येरकुंडे, प्रा इदलकंटे ,प्रा डॉ नाथराव मोरे,खिंडीवाले,सदाशिव स्वामी,डॉ विशाल पाटील, धनराज सनगले,पिंटू भोसले, इदलकंटे ,कोयले, अमोल नेमताबादे, देविदास कंजे,राम सूर्यवंशी,तानाजी जाधव, कल्याण बिरादार, संतोष भुताळे, भूसनवाड, बालाजी कारामुंगे, गणेश काळे यांचा विशेष सहभाग होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संजय जामकर यांनी केले, आपल्या प्रस्ताविकातून असे सांगितले की, शहरातील पीडित,शोषित, वंचित घटकापर्यंत सुविधा पोहचल्या पाहिजेत, त्या दृष्टीने तरुणांनी पुढाकार घेऊन काम करावे.तसेच प्रशांत हुडगे यांनी मित्रमंडळाचा हेतू व कार्यप्रणाली स्प्ष्ट केली, मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन वाघमारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मंडळानी केलेले संकल्प तसेच शहरातील बेवारस मृतदेहाची अंत्यविधी करणे असेल, आरोग्यच्या समस्या यावर भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ज्ञानोबा मुंडे यांनी केले.नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे निवडण्यात आली आहे:अध्यक्ष सचिन वाघमार उपाध्यक्ष प्रविण पटवारी,सचिव संजय जामकर,कोषाध्यक्ष पवन सूर्यवंशी सह सचिव अविनाश खरात,सदस्य प्रशांत हुडगे, मलंग शेख, प्रशांत खडके, विजय भोसले, मंगेश येरकुंडे, सतीश बिरादार हे राहणार आहेत.
