अर्धापूर (उध्दव सरोदे) राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तालुक्यातील 63 स्वस्त धान्य दुकानदारांचे कमिशन गेल्या सहा महिन्यापासून थकीत असल्यामुळे हे दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेतून अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य दिले जाते.या वितरणासाठी दुकानदारांना प्रतिक्विंटल 150 रुपये कमिशन मिळते मात्र जानेवारी 2025 पासून सर्वच दुकानदाराचे कमिशन थकले आहे.महिन्याच्या पाच तारखेला सर्व योजना मार्जिन थेट खात्यात जमा करावे अशी मागणी वेळोवेळी निवेदनद्वारे करण्यात आली.परंतू त्यावर वाढीव मार्जीनही नव्हती तर शासनाने 15 एप्रिल रोजी मार्जिन 150 रू वरून 170 रु करण्यास मान्यता दिली होती. मात्र हा निर्णय अद्याप अंमलात आलेला नाही.
यामुळे दुकानदारावर आर्थिक ताण वाढत असून दुकानदारांना धान्य वितरणा सोबतच ई-केवायसी,आधार सिडिंग,मोफत साडी वाटप ई-पास मशीन हाताळणी अशी कामे करावी लागतात.मात्र वेळेवर कमिशन न मिळाल्याने आमच्यावर आर्थिक ताण वाढत असल्याचे दुकान चालक सांगत असून लवकरात लवकर आमची समस्या सोडवून आम्हाला आमचे नियमित कमिशन देण्यात यावी. अशी मागणी दुकानदार करीत आहेत.
