नांदेड (उध्दव सरोदे) दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालय नांदेड स्थित केंद्रीय विद्यालय येथे पुस्तक पिटाराच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचा पुस्तक मैत्री एक नवा वाचनबंध हा उपक्रम राबविण्यात येत असून पी.एम.श्री योजनेच्या २०२५-२०२६ या उपक्रमांच्या कॅलेंडर नुसार ‘वाचन प्रोत्साहन सप्ताह’ उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.पुस्तक पिटारा हे विशेषतः प्राथमिक वर्गांसाठी असल्याने त्यांच्या वाचनाच्या गरजांनुसार आणि त्यांच्यामध्ये आनंदाने वाचनाची सवय विकसित करण्यासाठी विद्यालयाच्या वरिष्ठ विद्यार्थ्यांनी डिझाइन केलेले आहे. ज्यामध्ये कथा पुस्तके,कॉमिक्स, शब्दकोश,नैतिक कथा,मुलांची मासिके,कविता,चित्र पुस्तके, ध्वनीशास्त्रावर आधारित कथा असलेले सुरुवातीचे वाचक आणि वयानुसार प्रकरणांची पुस्तके आवडी आणि आकलन कौशल्ये वाढवण्यासाठी काल्पनिक आणि गैर-काल्पनिक साहित्याचे मिश्रण इत्यादींचा समावेश आहे.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री. अशोक कुमार विश्वकर्मा म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण (एन.ई.पी) २०२० मध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासात वाचनाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देण्यात आला आहे.ही मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्रा चे महत्त्व अधोरेखित करते की ज्यामध्ये वाचन आकलन हे सर्वोच्च प्राधान्य आहे.प्राथमिक शाळांमध्ये वाचन हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी,साक्षरतेला चालना देण्यासाठी,संज्ञानात्मक कौशल्यांना चालना देण्यासाठी आणि सामाजिक-भावनिक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.असा शैक्षणिक यशाचा पाया रचते आणि मुलांना सुसंस्कृत व्यक्ती बनण्यास मदत करते असे मत विद्यालयाचे मुख्याध्यपक श्री राम शृंगारे यांनी मांडले.विद्यालयाचे ग्रंथालय प्रमुख डॉ.हनवते मितेश यांच्या संकल्पनेतून पुस्तक पिटारा हि नावीन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात पूर्णत्वास आली.प्रत्येक वर्गामध्ये एक पुस्तक पिटारा ज्यामध्ये १०० पुस्तके असे पहिली ते पाचवी दोन तुकड्या मध्ये एकूण १० वर्गामध्ये १००० पुस्तके ‘पुस्तक पिटारा’ मध्ये देण्यात आली.प्रत्येक क्लास व ग्रंथालयामध्ये पुस्तक पिटारा हे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व वाचनामुळे मुलांना शब्द आणि वाक्य रचनांची विस्तृत श्रेणी मिळते ज्यामुळे त्यांच्या शब्दसंग्रहात लक्षणीय वाढ होते व मुले वाचत असताना त्यांना शब्द,वाक्ये आणि कथांचा अर्थ समजण्यास शिकायला मिळते ज्यामुळे त्यांची आकलन क्षमता सुधारते.वर्गामध्ये हे ‘पुस्तक पिटारा’ पाहून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नेहमी प्रमाणे केंद्रीय विद्यालय नांदेड आपली वाचन संस्कृती ची परंपरा कायम व नावीन्य पूर्ण प्रकारे जपत असते हे या उपक्रमातून सिध्द होते आहे.
