देवणी लक्ष्मण रणदिवे
मुंबई -- राज्यातील मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे आणि मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळावे, न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल तत्काळ सादर करावा, क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारसी तत्काळ लागू करण्यात याव्यात या मागण्यांसाठी आज आझाद मैदानावर जन आक्रोश महाआंदोलन करण्यात आले. त्यास राज्यभरातून या आंदोलनाला मोठ्या संख्येने मातंग समाजातील महिला उपस्थित होत्या.सकल मातंग समाजाने आतापर्यंत अनेक आंदोलने केली, पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. अनुसूचित जातीच्या आयोगाचे वर्गीकरण व्हावे यासाठी बदर समितीची स्थापना केली, परंतु या समितीने जवळपास वर्ष पूर्ण झाले तरी काहीही काम केले नाही. अभ्यास समितीच्या माध्यमातून विविध राज्यांचे अभ्यास दौरे करून वेळकाढू धोरण राज्य सरकारने अवलंबले आहे. या सरकारने मातंग समाजाची फार मोठी फसवणूक, दिशाभूल केली. येथे पंधरा दिवसांमध्ये आपल्याला हे आरक्षण मिळेल अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. अनेक मंत्र्यांनी यादी देखील मोठ-मोठे आश्वासन दिले होते परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. यावेळी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही अशी माहिती सकल मातंग समाजाचे वतीने केले होते यावेळी मंत्र्यांचा आश्वासनाने तुमच्या मागण्या लवकरात लवकर आम्ही मार्ग काढू असे सांगण्यात आले आहे,जन आक्रोश महाआंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे, सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
