Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्टार कोचिंग क्लासेस देवणी येथे दहावी बोर्ड उत्तीर्ण सत्कार सोहळा मोठा उत्साहात संपन्न स्टार कोचिंग क्लासेस काफीमुक्त परीक्षेत देवणी तालुक्यातून डोंगरे सृष्टी स्टार कोचिंग क्लासेसचा ठेवला मान मानवी हक्क अभियान संघटनेच्या कडूनही गुणवंत विद्यार्थ्यांची केले विद्यार्थ्यांचा कौतुक,



देवणी लक्ष्मण रणदिवे 


देवणी शहरात स्टार कोचिंग क्लासचे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला सृष्टी डोंगरे प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार सोहळा यशवंतरावजी पाटील, आर पी चव्हाण संचालक, विनायक चव्हाण संचालक, यु एन पवार संचालक, गोविंद पतंगे जेष्ठ शिक्षक जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर देवणी, गुरुलिंग सर, पत्रकार लक्ष्मण रणदिवे, यांच्या उपस्थितीत सर्व गुणवंत विद्यार्थी सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष यु एन पवार, यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेत अभ्यास केले पाहिजे आपली चूक अगोदर समजून घेतले पाहिजे आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो मार्गदर्शन केले, @चव्हाण सर यांनी आपल्या स्टार कोचिंग क्लासेस विद्यार्थिनी मुक्त परीक्षा दिल्यामुळे आमच्या क्लासचा निकाल शंभर टक्के लागला तरी विद्यार्थिनी आपल्या जीवनात चांगल्या प्रकारचे भरारी मारावी अशी सांगितले, @लक्ष्मण रणदिवे  यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना बोलताना सांगितले की आपण स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहावे व स्टार कोचिंग क्लासेस विद्यार्थी हे येणाऱ्या काळात अधिकारी बनून याच क्लासेस मध्ये त्यांचा सत्कार झाला पाहिजे व आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिले, @गोविंद पतंगे सर यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात त्याला समर्थपणे राहून आपण वेळेत अभ्यास करून आई वडिलांसाठी मेहनत घ्यावी असे सांगितले,या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,आर पी चव्हाण यांनी केले आहे,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.