देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील अजनी येथे सस्ती आदालत गावकऱ्यासोबत संवाद साधून घेण्यात आले सोमनाथ वाडकर तहसीलदार यांनी शेतकऱ्या सोबत संवाद साधत असताना सस्ती आदालत म्हणजे काय आपल्या शेतातल्या रस्ते शिवरस्ते असतील किंवा आपण वाद न घालता कोर्टाची पायरी न चढता आपापल्या आपसामध्ये भांडणे तंटे मिटून घेऊन एकमेकाबद्दल आदर निर्माण करा सस्ती आदालत कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना थेट प्रशासनाची संवाद साधण्याची संधी मिळत असून शासनाच्या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावपणे होत आहे असे मतही यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केले, यावेळी सोमनाथ वाडकर तहसीलदार,अनिता ढगे मंडळ अधिकारी, महेश पट्टेवाड तलाठी, ज्ञानोबा करमले तलाठी, सौ रायाबाई बिरादार सरपंच, रमेश पाटील पोलीस पाटील, अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानोबा करमले यांनी केले, आभार महेश पट्टेवाड यांनी मांडले
