शेतमजूर मजूरदारांना पाण्याविना असल्या टंचाईत पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे,
शेतकऱ्यांची दंडेलशाही तर प्रशासनाची बघ्याची भूमिका गावकऱ्यांचा तीव्र संताप विहिरी भोवतीच ठिय्या,
न्याय मिळत नसेल तर मानवी हक्क अभियान देवणी तालुक्याच्या संघटनेच्या वतीने प्रशासनाला देणार निवेदन,
देवणी लक्ष्मण रणदिवे
अचवला ता. देवणी येथील गावास पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतच्या विहीरीवर बेकायदा कब्जा करून गावचा पाणी पुरवठा बंद केल्याने गावकऱ्यांना वेठीस धरल्याने अचवलकरावर पाणी टंचाईचे भिषण संकट उभारले आहे. शेतकऱ्यांने दंडेलशाही केल्याने व प्रशासनाने केवळ बच्याची भुमिका घेतल्याने संतप्त झालेल्या अचवला ग्रामस्थांनी सदरील विहीरी भोवतीच ठिल्या मांडत आपला संताप व्यक्त केल्याचे पहावयास मिळाले.
देवणी तालुक्यातील अचवला गावासाठी दवहिप्परगा ता. देवणी या शिवारातून शासना मार्फत खास पाणी प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा होती प्रशासनाकडून न्याय मिळेल व पाणी टंचाईचे संकट दूर होईल म्हणून दोन दिवस वाट पाहून दि. ९ मे रोजी भर ऊन्हात समस्त अचवलकरांनी दवणहिप्परगा शेत शिवारातील विहीरी भोवतीच लेकरांबाळांसह ठिय्या दिला. या वेळी अचवला गावचे सरपंच, उपसरपंव ग्रामपंचायतवे सदस्य व गावकरी हे उपस्थित होते.पुरवठ्यासाठी अर्थीक खर्चातून विहीर पेऊन पाणी पुरवठा चालू होता. सदर विहीरीच्या शेजारील शेतकरी व्यंकट संग्राम पाटील यांनी शेतकरी इतर लोकांच्या सोबतीने अचवला गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीचा वीज पुरवठा तोडणे, विहीरीवरील विद्युत मोटार जाळणे, स्टार्टर बंद करणे आदी ऊपद्रवी व वेकावा कृत्य करून गावाचे पाणी स्वतःच्या शेतासाठी वापरत वापरण्यास सुरुवात केली आहे. या शिवाय पाणी पुरवठा करणाऱ्या सेवकासह गावातील पाणी पुरवठा करणान्ना यंत्रनेतील व्यंक्तीच्या अंगावर जाणे धमकावणे व पाणी पुरवठा बंद करून शेतकरी गावकऱ्यांना वेठीस धरीत आहेत,या बदल तहसिलदार देवणी यांचे कडे ग्रामपंचायत प्रशासनाने वेळी वेळी कळवूनही तहसिल प्रशासनाने गावकऱ्यांचा प्रश्न सोडवण्या ऐवजी उलट न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. या बद्दल गावकऱ्यांनी जिल्हाधीकारी लातूर तहसिलदार
देवणी गटविकास अधिकारी देवणी यांच्याकडे समस्त गावक-यांच्या दोनशे सह्यांचे निवेदन दिले आहे. तरी ही न्याय मिळत नसल्याने भर ऊन्हात लेकरांबाळांसह अचवला ग्रामस्थांनी सदरील विहीरी भोवती ठिग्गा मांडला या वेळी संबंधित शेतकऱ्यांनी नागरीकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची चर्चा आहे.सरद प्रकरणी तालुका प्रशासनाचे प्रमुखच हात वर करीत असल्याने ऐन पाणी टंचाईत प्रशासनाकडून गावक-यांची चेष्टा केली जात असून नागरीकांनी न्याय मानावा तरी कोणाकडे असा समस्त गावकऱ्यांकडून सवाल केला जात आहे.
