देवणी लक्ष्मण रणदिवे
लातूर : - येथील राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हासचिव तथा क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ ' लसाकम ' या बुध्दीजीवी कर्मचारी संघाचे विभागीय कार्याध्यक्ष मा.श्री.दयानंद कांबळे यांना राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार* २०२५ नुकताच जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील नामांकीत असलेल्या एकता सेवा भावी संस्थेच्या वतीने २६ वर्षापासून दिला जाणारा प्रतिष्ठेचा व मानाचा हा पुरस्कार दयानंद कांबळे यांनी आतापर्यंत केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेऊन जाहिर करण्यात आला असल्याची माहिती एकता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अजमत खान व पुरस्कार निवड समिती अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार मा.श्री.रमाकांत कुलकर्णी यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रान्वये कळविले आहे.
मंगळवार दि.२० मे २०२५ रोजी दुपारी २.३०.वा.मुंबई येथील बाळशास्त्री जांभेकर चौकातील मराठी पत्रकार भवनच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शानदार समारंभात विशेष अतिथींच्या शुभहस्ते सदरील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.सदरील राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल दयानंद कांबळे यांचे मराठवाड्याचे लढवय्ये *शिक्षक आमदार मा.श्री.विक्रमजी काळे माजी कुलगुरु प्राचार्य मधुकर गायकवाड प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे जेष्ठ विचारवंत प्राचार्य.डॉ.माधवराव गादेकर प्राचार्य अनील बापू काळे श्री.विष्णूभाऊ कसबे उपप्राचार्य संजय गायकवाड प्रा.अंकुश नाडे मदन धुमाळ गंगाधर आरडले राम व्यंजने बालाजी साळुंके उत्तम दोरवे प्रा.रामकिशन समुखराव शिवा कांबळे डॉ.सुवर्णा जाधव डॉ.दयाराम मस्के बि.पी.सुर्यवंशी अशोक तोगरे पांडूरंग देडे काजीम कादरी शिवहार रोडगे शिवाजी बीबराळे डॉ.मिलींद कांबळे राजकुमार मगर डॉ.मैनोदीन शेख महेश नाईकवाडे राहूल मोटे शेषराव लातूरे ,शाहूराज शिंदे लहुजी शक्ती सेना शिरूर आनंदपाळ तालुकाध्यक्ष, रवी मोतीरावे लहुजी शक्ती सेना उपाध्यक्ष देवणी, रवी रणदिवे उपाध्यक्ष, पत्रकार लक्ष्मण रणदिवे आदींनी अभिनंदन केले आहे.
