Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कै. रसिका महाविद्यालयात स्पोकन इंग्लिश व्होकॅब्लरी बुक पुस्तकाचे प्रकाशन




देवणी लक्ष्मण रणदिवे 


 देवणी कै. रसिका महाविद्यालय देवणी येथे महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री. राहुल चव्हाण लिखित 'स्पोकन इंग्लिश व्होकॅब्लरी बुक' या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर साहेब (अध्यक्ष, जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान, भोपणी) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थासचिव मा. श्री. गजाननजी भोपणीकर साहेब, सेवानिवृत्त शिक्षक श्री. आर. टी. इंगळे सर, प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे सर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना प्रा. डॉ. प्रशांत भंडे  यांनी प्रस्तुत पुस्तक हे विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन व संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी उपयुक्त असून विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याची पायाभरणी या पुस्तकाच्या माध्यमातून होईल असा आशावाद व्यक्त केला. केले. यावेळी श्री. राहुल चव्हाण यांनी माझ्या शैक्षणिक जडणघडणीमध्ये कै. रसिका महाविद्यालयाचे मोलाचे योगदान असून या महाविद्यालयाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून  सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडावेत, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले. वक्तृत्व कलेचे मार्गदर्शन मिळाले. यातून मला क्लासेस चालविण्याची व पुस्तक लेखनाची प्रेरणा मिळाली. असे प्रतिपादन केले. प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्व समृद्ध करण्यावर भर द्यावा व स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन केले. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थासचिव मा. श्री. गजाननजी भोपणीकर साहेब यांनी महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे अभिवचन दिले. वमहाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचे कौतुक केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. गोपाल सोमाणी यांनी केले. या कार्यक्रमास प्रा. डॉ. सुलोचना डेंगाळे, प्रा. अंकुश भुसावळे, प्रा. डॉ. सुदर्शन पेडगे, प्रा. डॉ.अंकुश भास्कर, प्रा. रोहिदास पावरा, यू. एन. पवार सर, विनायक चव्हाण सर, अनिल चव्हाण, सुनील जाधव, अविनाश चव्हाण, अनिल सुभाष चव्हाण, अमोल पवार, रामभाऊ, दिलीप पवार, राहुल चव्हाण, सतिश चव्हाण, पृथ्वीराज पवार, विकास जाधव, म्हादा सर, जीवने सर यांच्यासह महाविद्यालयातील व आबासाहेब इंग्लिश स्कूल मधील प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.