देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी : तालुक्यातील धनेगाव येथील शिवारात सोमवारी दुपारच्या सुमारास रानडुकरांने एका तरुण शेतकऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात तरुण शेतकरी गंभीर जखमी झाला असुन त्याला उपचारासाठी उदगीर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, धनेगाव येथील शिवारात सोमवारी शेतकरी राजकुमार वसंतराव बिरादार हे शेतात गेले असता नदीकाठच्या शेतात रानडुक्कर यांनी या शेतकऱ्यांवर चांगलाच हल्ला चढविला. यात ते गंभीर जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी उदगीर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.लातुर वनविभागाकडे तक्रारः लातुर येथील जिल्हा वनविभाग अधिकारी यांना निवेदन देवून सदर शेतकऱ्यांना मदत मिळावी व वन्यप्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केल्याची माहिती उपसरपंच रामलिंग शेरे यांनी दिली.वन्य प्राणी मोकाट सद्यस्थितीला ऊसाच्या पिकांचे गाळप झाले. तर इतर पिकांची काढणी झाल्याने राने मोकळी झाली आहेत. त्यामुळे वन्यप्राणी यांना लपण्यासाठी जागा नसल्याने हे हिंस्त्र प्राणी आता शेतकऱ्यावर हल्ला करत आहेत. या प्राण्यांचा बंदोबस्त कर-ावा व शेतकऱ्यांना उपचारासाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी शेतकरी वगार्तुन होत आहे.
