देवणी लक्ष्मण रणदिवे
कष्टकरी शेतकऱ्यांच्या कष्टावर या जगाचा उदरनिर्वाह भागतं असतो,शेतकऱ्यांचा शेतीचा अर्थात काळ्या आईचा लळा कधीचं कमी होत नाही,हे या शेतकऱ्यांने शेतातचं वाढदिवस साजरा केला यावरुन लक्षात येते,सतत मातीशी नाते आसलेले लातुर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातल्या सावरगावचे रहिवासी शेतकरी पंढरी जोळदापके यांनी आपल्या शेतातचं निसर्गाच्या कुशीत आणि पशु पक्षांच्या उपस्थित आपला वाढदिवस साजरा केला.यामुळे यांचे समाज समुहात कौतुक होत आहे हल्ली जगात वाढदिवस साजरे करण्याचे अनेक प्रकारे साजरे केले जाते,वाढ दिवस कार्यक्रमासाठी कोणी सभागृहे शोधतात,तर कोणी मोठी हाँटेल,तर कधी रहात्या घरी तर कधी कधी रस्त्यावर ही वाढदिवस साजरे केले जाऊन रस्त्यावर बैनर लावुन खुप गवगवा केला जातो मात्र या शेतकऱ्यांनी आपले नाते मातीशी घट्ट आसले पाहिजे,सजीवांसाठी मातीची भुमिका आईची असुन जीवन जगविणाऱ्यां आईला सोडून इतरत्र ठिकाणी वाढदिवस साजरा करणे हे काळ्या आईचे उपकार विसरणे आहे होईल अशी प्रतिक्रिया या शेतकऱ्यांनी दिली आहे,या वाढदिवसाच्या कार्यक्रमात शेतकरी राजांचे निवडक संवगडी मानवी हक्क अभियानाचे लातुर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे, गजानन गायकवाड,मारुती सुर्यवंशी,इतर काहीजण उपस्थित होते,तर पक्षांनी ही मंजुळ आवाजांनी उपस्थितीती या क्षणी दर्शविली,उपस्थितांनी आभिनंदन करुन दिर्घ आयुष्यच्या शुभेच्छा ही यावेळी पंढरी जोळदापके यांना दिल्या,या कार्यक्रमातुन काळ्या आईवर अर्थात जगविणाऱ्यां शेतीवर प्रेम असणे आवश्यक असल्याचा बहुमुल्यं संदेश देण्यात या शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.या अनोख्या वाढदिवसा निमित्त पंढरी जोळदापके यांना मानवी हक्क अभियानाचे लातुर जिल्हा सचिव मारुती गुंडीले,जळकोट तालुक्याचे समन्वयक आविनाश तोगरे,अनिल घोडके,तानाजी सोनकांबळे, गोविंद शिंदे,यांनी सुध्दा अभिनंदन केले व शुभेच्छा देऊन कौतुक ही केले आहेत.
