जितेशभाऊ रणदिवे विळेगावकर करणार बेमुदत अमरण उपोषण विळेगाव ग्रामपंचायतला दिला सहा दिवसाचा वेळ अन्यथा मानवी हक्क अभियानाचाही संघटनेचाही जाहिर पाठिंबा
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील विळेगाव या गावात आज हि मातंग समाजाला पाण्यासाठी संघर्ष कराव लागत असल्याची शर्मणाक बाब समोर आली आहे, या बाबत सविस्तर वृत्त असे कि, देवणी तालुक्यातील विळेगाव गावात मातंग समाजाला पुरवल जाणार पाणी हे बारामाही अतिशय घाण व दूषित पाणी पुरवल जात आहे,दूषित पाण्यामुळे समाजातील अनेक लहान थोर याची किंमत गंभीर त्वचारोग व अन्य आजारांचा सामना करून चुकवीत आहेत, मातंग समाजासाठी सांडपाणी दूषित तर पिण्याच्या पाण्यासाठी काहीच उपाय योजनाच नाही, उन्हाळी दिवसात हाताला काम नसल्यामुळे आर्थिक दृष्ट्या हतबल झालेला मातंग समाज आज हि बारामाही पाच ते दहा रु प्रमाणे एक घागर विकत घेऊन आपली तहान भागवत आहे, पाण्या अभावी या समाजाचे एवढे हाल असतानाही या समाजाकडे ग्रामपंचायतीच लक्ष नाही हि खूप मोठी शोकांतिकाच,देशाला स्वातंत्र्य मिळून कित्तेक वर्ष झाली तरी आज हि मातंग समाजाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो हे दुर्दैव,कांही दिवसापूर्वी केंद्रसारकारची "हर घर जल" हि योजना मोठ्या थाटामाटात भूमिपूजन करून दिमाखात पार पाडण्यात हि आली पण अद्याप हि या योजनेच्या नळाला पाणी मात्र आलं नाही हे तेवढंच सत्य, वेळोवेळी समजबांधवाकडून पाण्याची तक्रार ग्रामपंचायतीला दिली पण त्याचा काही परिणाम समाजाविषयी गाढ झोपलेल्या ग्रामपंचायतीला झाला नाही, याचे गांभीर्य लक्षात घेता,मातंग अस्मिता संघर्ष सेनेच्या वतीने विळेगाव ग्रामपंचायतिचे ग्रामसेवक श्री नागलगावे साहेब यांना लेखी निवेदन देण्यात आले,येत्या सहा दिवसाच्या आत मातंग समाजाला शुद्ध सांडपाणी व पिण्याच्या पाण्याची सोय न केल्यास मास संघटना देवणी तालुक्याच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा मास संघटनेचे देवणी तालुका अध्यक्ष तथा पत्रकार जितेशभाऊ रणदिवे (विळेगावकर) यांनी ग्रामपंचायत कार्यालय विळेगाव यांना दिला आहे.समाजाचा जिथे विषय गंभीर तिथे जितेशभाऊ रणदिवे(विळेगावकर)खंबीर राहून विषय कसला जरी असला ते एकदा हाती घेतला कि मार्गी लावल्याशिवाय सुट्टी न देणारी अशी भूमिका जितेशभाऊ रणदिवे यांची पहिलपासूनच दिसून आली आहे,मग या विषयी ग्रामपंचायत हा विषय किती गांभीर्याने घेते हे पाहणे मात्र
