Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गुरनाळ येथे अखंड हरिनाम सप्ताह




देवणी लक्ष्मण रणदिवे 


देवणी तालुक्यातील गुरनाळ येथे हनुमान जयंती व ग्रंथ करतेश्रीधर स्वामी यांच्या पुण्यतिथी निमित्त वैकुंठवासी ह भ प रमेश महाराज दावणगावकर यांचे कृपेने चालत असलेला हरिनाम सप्ताह ४३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.हा सप्ताह शिवाजी बाबाराव माने यांचे अध्यक्षतेखाली असून पारायण व्यासपीठ प्रमुख ह भ प उद्धव महाराज शिवपुरकर व ह भ प दत्ता महाराज बिरादार गुरनाळ हे राहणार आहेत. या सप्ताहात हनुमान जयंती निमित्त दि १२रोजी रुद्राभिषेक होईल व  ह भ प पंडित पोतदार आळंदी यांचे कीर्तन होईल.दि१३ रोजी प्रवचन ह भ प परमेश्वर हसणाळे व ह भ प गिरीधर शिंदे तर किर्तन ह भ प श्रीनिवास गुरुजी मन्ना उमरगा दिनांक १४ रोजी प्रवचन दत्तू महाराज लासोना तर कीर्तन किशोर महाराज अरज खेडकर दिनांक १५रोजी प्रवचन ह भ प शिवाजी होसुरे तर कीर्तन व्यंकट महाराज बोळेगाव दिनांक १६ रोजी प्रवचन ह भ प नंदू महाराज आंबेगावकर तर कीर्तन ह भ प स्वप्निल महाराज दौंड दिनांक १७ रोजी प्रवचन ह भ प श्रीनिवास गुरुजी मन्ना उमरगा तर कीर्तन ह भ प संदिपान महाराज सुमठाणकर दिनांक १८ रोजी प्रवचन ह भ प पक्षराज महाराज तर कीर्तन ह भ प जनक भागवत अण्णा महाराज अपशिंगेकर दिनांक १९रोजी प्रवचन ह भ प सह्याद्री महाराज तर कीर्तन ह भ प एकनाथ महाराज हांडे पंढरपूरकर दिनांक २० रोजी काल्याचे किर्तन राजेश पाटील गुंजर्गेकर यांचे होईल. 

या सप्ताहा निमित्ताने परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या भजन हरिपाठ कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा ही ग्रामस्थांनी विनंती केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.