देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील मौजे विळेगाव येथे दलित वस्ती मातंग समाजाला वर्षानुवर्षे पाणी टंचाई विरुद्ध संघर्ष करावा लागत आहे,
पाणी टंचाई जणू परंपरागत मातंग समाजाच्या पिढ्यानंपिढ्याच्या भाळी गोंधलेलं गोंधनच अशी अवस्था विळेगाव गावातील मातंग समाजाची झाली आहे,आजपर्यंत पाण्यासंदर्भात असंख्य योजना रबावण्यात आल्या तरी मातंग समाजाला वर्षानुवर्षे पाणी टंचाईचा सामना का करावा लागतो? याचा अर्थ दाल मे कुछ काला है,या पुरी दाल हि काली है,
विशेष म्हणजे सरपंच मातंग समाजाचा आहे,सरपंचांला आपल्या पदाचे गांभीर्य नाही,सरपंच पदाची जागा हि सह्याजीराव ने घेतली आहे,हि मातंग समाजाचे खूप मोठे दुर्दैव आहे,सरपंचाच्या अश्या भूमिकेमुळे देश स्वातंत्र्य होऊन अनेक वर्ष झाली तरी पाण्याच्या घोटा-घोटासाठी मातंग समाजाला संघर्ष करावा लागतोय, म्हणून हि बाब गांभीर्याने घेत मातंग अस्मिता संघर्ष सेनेचे देवणी तालुका अध्यक्ष तथा पत्रकार जितेशभाऊ रणदिवे (विळेगावकर) यांनी या विषय संदर्भात विळेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नागलगावे साहेब यांना लेखी निवेदन दि 07/04/2025 रोजी दिले होते,त्या निवेदनात मातंग समाजाला सुरुळीत स्वच्छ सांडपाणी व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती,परंतु अद्याप कसल्याही प्रकारची दखल विळेगाव ग्रामपंचायत कडून घेण्यात आली नाही, म्हणून दि. 11/04/2025 रोजी मा. गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती देवणी,मा. तहसीलदार साहेब देवणी व ग्रा.पा.पु/ला.पा.जी.प उपविभाग देवणी यांना निवेदन देण्यात आले, निवेदनातील मागण्या मान्य न केल्यास दि. 15/04/2025 रोजी पासून मा. गटविकास अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा पत्रकार तथा मास संघटनेचे देवणी तालुका अध्यक्ष जितेशभाऊ रणदिवे यांनी दिला आहे,मुळात मातंग अस्मिता संघर्ष सेना हि दीन-दलित, गोरगरीब,बहुजणांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी सामाजिक संघटना म्हणून ओळखली जाते, त्यातल्या त्यात एक हिंदी सिनेमातली डायलॉग आहे ती "जब तक तोडेंगे नहीं... तब तक छोडेंगे नहीं हि भूमिका जितेशभाऊ रणदिवे यांना फिट बसल्याचे चित्र पहिलं पासूनच बघायला मिळालं आहे,
सरपंच असा ग्रामपंचायत तशी आणि त्यातल्या त्यात,पाणी सोडणारी व्यक्ती तर काय जणू ग्रामपंचायत चा एकुलताएक लाडाचा जावईच,मनात असेल तर पाणी सोडणार, नसेल तर मोटार जळाली, वायर जळाली, पाईप फुटला म्हणून महिना महिना पाणी पुरवठा बंद ठेवणार,पाणी पुरवठा जरी पुरवील तर ते अगदी दूषित पाण्याचा.एकंदरीत विळेगाव ग्रामपंचायत मातंग समाजाला जाणून बुजून मूलभूत सुविधा/हक्कापासून वंचित ठेवण्याच काम करत आहे, त्यामुळे मातंग समाजात संतप्त लाट आहे, मातंग समाजाच्या पाण्याविषयी गाढ झोपेचं सोंग घेऊ करणाऱ्या विळेगाव ग्रामपंचायतीला कधी जाग येईल हे पाहण्यासाठी मातंग समाज उत्सुक आहे.
