देवणी प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील बोरोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षा निमित्त चालू असलेला शिव सप्ताहा निमित्त प्रसिद्धी माध्यम म्हणून उत्कृष्ट पत्रकार जाकीर शादूलसाब बागवान यांना शिव व्याख्याते डॉ. दिनेश भिसे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.यावेळी केंद्र प्रमुख राजकुमार मुळखेडे सर, इंजिनिअर राजकुमार कोयले, योगाचार्य रामचंद्रजी गरड, भरत कोयले सर, तानाजी बालुरे सर,संजय भाऊ कोयले,दिपक पाटील, काशिनाथ शेंडगे, अभंग बिरादार, प्रा.राहूल बालूरे शालेय समिती अध्यक्ष सत्यदेव गरड, सामाजिक कार्यकर्ते दत्ता भाऊ हुरुचनाळे, पत्रकार राहूल बालूरे सह अदिंची उपस्थिती होती.
शिव सप्ताहानिमित्त दिं 28 मार्च ते दिं 3 एप्रिल दरम्यान संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत शिवचरित्रांची व्याख्यानमाला आणि सकाळी 8 ते 10 या वेळेत ग्राम गीतावाचन करण्यात येत आहे. सदरील कार्यक्रमाचे आयोजन श्री संत लक्ष्मणनाथ भीमनाथ महाराज मठ देवस्थान येथे जिल्हा परिषद प्रशाला बोरोळ आणि कै. यशवंतराव चव्हाण मा. व उच्च माध्यमिक विद्यालय बोरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
