९ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शन
१० एप्रिल रोजी शिवपार्वती विवाह सोहळा
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी :- शहरातील श्री ग्रामदैवत महादेव मंदिर यात्रा महोत्सव निमित्त दि.३० मार्च ते ११ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये दि.३० मार्च ते ११ मार्च एप्रिल पर्यंत दररोज सकाळी ९ ते १२ संगीत महारुद्राभषेक तर रात्री ९ ते ११ शिवभजन मंगळवारी दि. ८ एप्रिल रोजी रात्री९ ते १२ दयानंद महाराज नागपल्ले देवर्जनकर यांचे शिवकर्तन होणार आहे .
बुधवारी दि. ९ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शन होणार आहे. यामध्ये सकाळी ८ वाजता नोंदणी तर तर दुपारी १ वाजता निवडी होणार आहेत. बुधवारी सायंकाळी ७ वाजता शिवपार्वती हळदी सोहळा संपन्न होणार आहे. यानंतर गुरुवारी दि.१० एप्रिल रोजी दुपारी १ वाजता शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न होणार आहे. तर शुक्रवार दि.११ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता भव्य भव्य जंगी कुस्तीचे आयोजन करण्यात आले. आहे यामध्ये प्रथम येणाऱ्या ११,०००/- द्वितीय ७०००/- तृतीय ५०००/- असे आयोजन करण्यात आले आहे. तर शेवटची कुस्तीच जिंकणाऱ्या पैलवानास दिनेश तपसाळे यांच्याकडून तीन फुटी चांदीचे गदा बक्षीस देण्यात येणार आहे. तरी देवणी पंचक्रोशीतील सर्व सदभक्तांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त समिती व यात्रामहोत्सव समिती श्री ग्रामदैवत महादेव मंदिर आणि ग्रामस्थांनी यांनी केले आहेत.फोटो मेल केला आहे.
