अनुसूचित जाती पुरुष सरपंच पद अजनी, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी देवणी खुर्द सरपंच पदाचे आरक्षण
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत शुक्रवारी दि.२४ दुपारी काढण्यात आले.यात तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या चार ग्रामपंचायती पैकी वलांडीचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी बोरोळचे अनुसूचित जमाती महिला, जवळग्याचे नामा प्रवर्ग महिला तर दवणहिप्परगाचे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहे. शुक्रवारी दुपारी येथील पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार सोमनाथ वाडकर , गटविकास अधिकारी सागर वरंडेकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्या उपस्थितीत चिठ्ठी काढून तालुक्यातील सरपंचपदाची सोडत काढण्यात आली. यावेळी तालुक्यातील ४५ गावामधील विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.असे असेल सरपंच पदाचे तालुक्यातील गावनिहाय आरक्षण : अनूसूचित जाती : हिसामनगर, अंबानगर, बोळेगाव, हेंळब, आजनी ,अनूसूचित जाती महिला : संगम, होनाळी, तळेगाव (भोगेश्वर), कवठाळ, अनूसूचित जमाती : डोगरेवाडी.अनुसुचित जमाती महिला बोरोळ,नागरिकांचा मागास प्रवर्ग : आचवला, इंद्राळ, चवणहिप्परगा, हंचनाळ, विळेगाव, अनंतवाडी / इस्मालवाडी,
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : कोनाळी, जवळगा, बोंबळी (खुर्द), माणकी, सावरगाव, देवणी (खुर्द)
खुला प्रवर्ग : वलांडी, कमरोदिनपुर, वडमुंरबी, धनेगाव, नागतीर्थवाडी, नेकनाळ, टाकळी, वागदरी, आनंदवाडी, बटनपुर, गुरनाळ खुला प्रवर्ग (महिला): कमालवाडी, दरेवाडी, दवणहिप्परगा, नागराळ, भोपणी, लासोना, सय्यदपुर, आंबेगाव, सिंधीकामठ, गुरदाळ, गौंडगाव
