Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वलांडीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.





देवणी लक्ष्मण रणदिवे 


देवणी तालुक्यातील वलांडी भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त वलांडीचे  सरपंच सौ, राणीताई भंडारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रतिमेचे पूजन करून त्रिसरण पंचशील घेण्यात आले.या झेंडावंदन कार्यक्रमाला  सरपंच राणीताई भंडारे,माजी आ. धर्माजी सोनकवडे,  व्यंकटराव पाटील,उपसरपंच महेमूद सौदागर,माजी सरपंच राम भंडारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बालाजी बिरादार,राजू हुडगे, आयुब कुरेशी, उमाकांत नागलगावे, नवनाथ सोनकावडे,दिनेश पाटील, मुस्ताक कादरी,कल्याण बनाळे, रवी गायकवाड, ज्ञानोबा पाटील,डॉ.विलास गरड, हकीम बौवडीवाले, संतोष बिरादार, बालाजी सोनकावडे, रफिक सौदागर,विठ्ठल बनसोडे, साबेर पठाण, माजी सरपंच महंमद शुकूर बौडीवाले, अविनाश गायकवाड, दीपक कलोरे,सुनील चिल्लरगे, विमलबाई बनसोडे,सागरबाई बनसोडे,सुरेखा वाघमारे,आरती मोराळे,इत्यादी उपासिका उपस्थित होते.यावेळी महसूल विभागाचे देवणी तहसीलचे नायब तहसीलदार लहू कांबळे, तर पोलीस प्रशासनाचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गौंड, पोलीस हवालदार राजेश लामतुरे,अंकुश गायकवाड, वसंत बिबिनवरे, शिवाजी बीबीनवरे, लक्ष्मण रणदिवे पत्रकार, उपस्थित होते. भीमसैनिकाकडून नागरिकांना लाडू मिठाईचे प्रसाद वाटप करण्यात आले.तर या कार्यक्रमानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यत आले होते. माऊली ब्लड बँक लातूरचेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष नितीन वाघमारे, उपाध्यक्ष बालाजी सोनवणे, मुकेश कांबळे,रहिम शेख, धम्मदीप मोदाळे,बालाजी मोदाळे,यांच्यासह सर्व भीमसैनिकानी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. विलास  वाघमारे,

 धनराज बनसोडे,यांनी केले यानंतर लागलीच वलांडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच राणीताई भंडारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन  करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.