देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील वडमुरंबी येथील हनुमान मंदिर परिसरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह संत तुकाराम महाराज बीज आणि संत एकनाथ महाराज षष्ठी खूप मोठ्या आनंदाच्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्रात नावलौकिक असलेले आदरणीय कीर्तनकार भागवताचार्य सोपान सानप शास्त्री महाराज यांच्या काल्याची किर्तन सेवा २३ मार्च २०२५ रविवार सकाळी ठीक दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत काल्याचे किर्तन सेवा होऊन महाप्रसादाने सांगता झाली.या अखंड हरिनाम सप्ताहाचे वडमुरंबी येथील वैकुंठवासी वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आदर्श मातृतुल्य हरिभक्त पारायण कोमलताई दशरथराव मोरे यांच्या प्रेरणेने त्यांचे लहान बंधू वडमुरंबी नगरीचे महिला सरपंच पती ह. भ.प. मधुकरराव दशरथराव मोरे यांनी समस्त तसेच ग्रामस्थ वारकरी सांप्रदायाचा वारसा जोपासत हा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी प्रतीप्रमाणे खूप मोठा उत्साहात साजरा करीत आहेत. २३ मार्च हा अखंड हरिनाम सप्ताहाचा दहीहंडी काला असल्याने ग्रामस्थ भाविक भक्त वडमुरंबी पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील वारकरी संप्रदायाच्या दिंड्या वडमुरंबी येथे दाखल झाल्याने वैकुंठवास म्हणजेच पंढरपूर असल्याचे पहावयास मिळते. तसेच मंदिर परिसरामध्ये अनेक दुकाने बालगोपाळ चिमुकल्यांसाठी अनेक दुकाने आकाशी पाळणे, खिलोने सजवल्याने बाळ गोपाळ, भाविक भक्तांच्या गर्दीने या परिसरामधील भाविक भक्तामध्ये आणि बाल गोपाळ यांच्यामध्ये खूप मोठा आनंद झालेला पहावयास मिळाला. या कार्यक्रमाचे संयोजक ह.भ.प मधुकरराव मोरे ह.भ.प रोहिदास मोरे आणि ग्रामस्थ भाविक भक्तांच्या वतीने महाराजांचे पुष्पहार घालून फुलांचा वर्षाव केला. यावेळेस भाविक भक्तामध्ये एकच नामाची मोठी गर्जना झाली ती म्हणजे पुंडलिका वरदा हरी विठ्ठल नामाने भक्तामध्ये मोठा आनंद गगनामध्ये मावेनाशी झालेला पहावयास मिळाली. तसेच सर्व भाविक भक्तांना असे वाटत होती की कीर्तनकार महाराज ह.भ.प भागवताचार्य सोपान शास्त्री जणू काही पांडुरंगचा आवतरल्यासारखे भक्तामध्ये आनंद झालेला पहावयास मिळाला.
