सामाजिक जण आरोग्य सोशल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.
विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त मोजे बेलसकरगा ता. उदगीर येथे बुद्ध मूर्ती स्थापना व तक्षशिला बुद्धविहाराचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजण करण्यात आले होते. त्या निमित्ताने एक सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक जन आरोग्य सोशल फाउंडेशन व राधाई ब्लड सेंटर उदगीरच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे साहेब हे होते, तसेच माजी.जि.प. अध्यक्ष राहुलभय्या केंद्रे, रामराव येनकीकर मामा, ज्ञानेश्वर बिरादार, गावच्या सरपंच मा. गुंडूबाई सोपान बिरादार, मारोती बिरादार, तानाजी बिरादार, गौतम कांबळे,मारोती कांबळे,मारोती वाघमारे,साधुराम कांबळे,विशाल गायकवाड, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिषेक विश्वनाथ कांबळे,किशोर कांबळे, माधव गायकवाड, विनोद गायकवाड, विश्वजीत कांबळे, राजेश कमलाकर, पिराजी कांबळे, दिनेश सोनकांबळे, उद्धव शिंदे, राजेश वाघमारे तसेच सामाजिक जन आरोग्य सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सचिव चंद्रकांत गायकवाड व इतर मंडळी यांच्या उपस्थितीत बुद्धमूर्ती स्थापना, तक्षशिला बुद्धविहार लोकार्पण सोहळा व रक्तदान शिबिर मोठ्या थाटात संपन्न झाला.
.jpeg)
