देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा ठेवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत
मंगळवार २५ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवणी खुर्द येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती देवणी खुर्द तर्फे रांगोळी स्पर्धा , निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले,यामधे श्रेया नामदेव मुराळे ,रोली संजय मुराळे श्रावणी लक्ष्मण रणदिवे,आयान जलिल पठाण,नर्सिंग दिंगबर रणदिवे , लक्ष्मी राजकुमार मेहेत्रे, प्राजक्ता चामवाड,मयुरी कांबळे यांना बक्षीस वाटप करण्यात आले, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले संदिप पाटील, नागनाथ व्यंजने, पत्रकार लक्ष्मण रणदिवे, संदिप गरड व शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक एस पी बिरादार , मोहित कुमदाळे, नितीन बिरादार,व गायमाळे ताई व विद्यार्थी शालेय समितीचे सर्व सदस्य पुरुष युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
