देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी:-आपल्या कर्तुत्वाच्या माध्यमातून अल्पावधीतच एक शिस्तप्रिय आणि डॅशिंग अधिकारी म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवलेले, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करणारे देवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.श्री.सागर वरंदेकर यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना साहेबांनी विविध विषयांना हात घातला. त्यातला एक विषय म्हणजे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण करण्यासाठी लवकरच तालुक्यातील सर्व शाळांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या विविध परीक्षा आयोजित केल्या जातील हा माणूस बोलून दाखवला त्यांच्या या निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यातआले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्री अनिल कांबळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री मनोज कन्नाडे,ग्रामसेवक श्री अनिलजी आवले ,अधिकारी,पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते
