Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मा.तृप्ती अंधारे यांची हेळंब येथे भेट उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षांसाठी दिली भेट



देवणी लक्ष्मण रणदिवे 


देवणी तालुक्यात उल्हास 

नवसाक्षर साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी दिनांक २३ मार्च २०२५ रोजी घेण्यात आली.या परीक्षेस मा.तृप्ति अंधारे शिक्षणाधिकारी (योजना) जि.प.लातूर व त्यांची टिम यांनी हेळंब ता.देवणी येथे प्रत्यक्ष भेट देऊन उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेची पाहाणी केली. देवणी तालुक्यात एकूण ७६ केंद्रावर ही परीक्षा पार पडली असून या परीक्षेसाठी तालुक्यातून एकूण १०३१ असाक्षर परीक्षेस पात्र झाले होते. त्यापैकी १०२७ असाक्षरांनी परीक्षा दिली असल्याचे विभाग प्रमुख तथा सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री आबासाहेब भद्रे यांनी सांगितले. या परीक्षेस तालुक्यातून ७०६ महिला व ३२५ पुरुष असे एकूण १०३१ असाक्षर परीक्षेस पात्र झाले होते पैकी ७०४ महिला व ३२३ पुरुष तसेच ४ दिव्यांग असाक्षर अशा एकूण १०२७ असाक्षरांनी देवणी तालुक्यात एकूण ७६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा दिली आहे.सदरील परीक्षा ही सुव्यवस्थितपणे पार पडल्याचेही विभागप्रमुख तथा सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री आबासाहेब भद्रे यांनी सांगितले तसेच गोंडगाव केंद्रामध्ये परीक्षा शांतपणे पडली देवणी खुर्द येथे उल्हास नवसाक्षर साक्षरता कार्यक्रमांतर्गत १७ असाक्षर दिली परीक्षा केंद्र संचालक बिरादार एसपी, स्वयंसेवक लक्ष्मण रणदिवे, पठाण आयान जलील, केंद्र समन्वयक नरवटे के एन, सहशिक्षक बि,वाय, तेजेवाड डी आर सहकार्य केले, तसेच गोंडगाव केंद्राला भेट केंद्रप्रमुख नरवटे के एन, दिले आहे तसेच गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, एपीओ, केंद्रप्रमुख शिक्षक स्वयंसेवक यांनी देवणी तालुक्यातील या परीक्षेसाठी सर्वांनी सहकार्य केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.