सोमनाथपूर (एल.पी.उगीले): येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सोमनाथपूर ग्रामपंचायतच्या प्रथम नागरीक सरपंच सौ. अंबिका ज्ञानेश्वर पवार यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामसेवक अवकाश पवार, उपसरपंच अमित माडे, शिवयोगी अप्पा तोंडारे तसेच सुजिता चव्हाण, लक्ष्मण आडे, ज्ञानोबा पवार, अभिनव शिंदे, अश्विनी घोगरे, प्रभु आडे, राजु वैजापूरे सह सर्व कर्मचारी वृंद यांची प्रमुख उपस्थिती होती. सरपंच सौ. अंबिका ज्ञानेश्वर पवार यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी सदस्या सौ.शिवकर्णा अंधारे यांनी शिवचरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमित माडे यांनी तर आभार प्रदर्शन सौ.शिवकर्णा अंधारे यांनी मानले.
