देवणी लक्ष्मण रणदिवे
लातुर जिल्ह्यातील शिरुर आनंतपाळ तालुक्यातल्या साखोळचे रहिवासी शाहुराज धोंडीबा शिंदे,जात-मांग,यांचे शेजारी १) नंदकुमार लिंगरुपे २) सीमा भ्र.नंदकुमार लिंगरुपे जात-कोळी हे शाहुराज यांच्या दारातील सिनटेक्स लगत नेहमी कचरा टाकत असल्याने शाहुराज यांनी माझ्या दारात कचरा टाकु नका असे सांगितले असता तु कचरा टाकण्या पासुन रोखणारा कोण म्हणुन वरील दोघांनी शाहुराज यास शांतता भंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन अपमान केले व दगडाने मारुन गंभीर दुखापत केले आहे,व जीवे मारण्याची धमकी दिले आहेत याबाबत शिरुर आनंतपाळ पोलिस ठाणे येथे C.R.no.००४५, अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१),११५,३५२,३५१(२),
३(५) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे,या प्रकरणाची दखल मानवी हक्क अभियानाने घेतली असुन आनुसुचित जाती जमातीच्या कुठल्याही इसमाच्या घरासमोर अनुसुचित जातीचा नसलेला व्यक्ती जाणिवपूर्वक केरकचरा टाकतो हे आनुसुचित जाती जमाती (आत्याचार प्रतिबंधक) सुधारीत अधिनियम २०१५ च्या कायद्या कलम ३(१)C प्रमाणे गुन्हा आहे तरी या कायद्याच्या कलमचा या गुन्ह्यात समावेश करण्यात यावे, शाहुराज शिंदे यांच्या कुटुंबीयांना कायदेशीर स्वरक्षण द्यावे अशी मागणी मानवी हक्क अभियानाचे लातुर जिल्हाध्यक्ष अनंत साळुंखे, उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे,लातूर जिल्हा सचिव मारुती गुंडीले,शिरुर आनंतपाळ तालुका आध्यक्ष गणेश कांबळे यांनी केली आहेत.
