Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मराठा सेवा संघ वतीने रक्तदान शिबीर व व्याख्यानाचे आयोजन





उदगीर (एल.पी.उगीले) मराठा सेवा संघ उदगीरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दिनांक आठरा फेब्रुवारी 2025 रोजी प्रा. डॉ. क्रांती विठ्ठलराव मोरे, लातूर यांचे,"हिच जिजाऊ जिने घडविले दोन छत्रपती"  या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. विस फेब्रुवारी 2025 रोजी सुप्रसिद्ध वक्ते, लेखक, नाटककार तथा चित्रलेखाचे माजी संपादक ज्ञानेश महाराव, मुंबई, यांचे शाहीराचे छत्रपती शिवराय, या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दोन्ही व्याख्याने नगर परीषद प्रांगणामधे सध्याकाळी सात ते नऊ या वेळेत होणार आहेत, तर 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दुधिया हनुमान मंदिर येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून माजी मंत्री आ. संजय बनसोडे उपस्थित राहणार आहेत. वरील दोन्ही कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. अंजुम कादरी व रमेश बिरादार हे राहणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. गोविंद केंद्रे, जिल्हा बँकेच्या सचालिका लक्ष्मीताई भोसले, प. स. चे माजी सभापती प्रा. डॉ. शिवाजी मुळे, कृ. उ. बा. स. चे माजी सभापती गोविंदराव भोपणीकर, बाजार समितीच्या सभापती प्रितीताई भोसले, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, राकाचे तालुका अध्यक्ष बालाजी भोसले, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष मनोज चिखले, मादलापुरचे सरपंच उदयसिह मुंडकर, रोहन जाधव, गोविंद शेळके,सत्यवान बोरोळकर, विजयकुमार चवळे, संतोष बिरादार, प्रकाश साखरे, धनाजी मुळे, अनंत चोंदे,शिवाजी पाटील,आशिष राजूरकर, बिपीन पाटील,डॉ. रामेश्वर जाधव, आदी उपस्थित राहणार आहेत.

तरी रक्तदान शिबि व व्याख्यानाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष प्रा. विवेक सुकने, प्रदिप ढगे, राजकुमार कानवटे, संदीप जाधव, संदीप नाईक, प्रा. भास्कर मोरे, गणपत गादगे, राजकुमार माने, जिजाऊ ब्रिगेड च्या अनिता जाधव, पुष्पा जाधव, प्रतिभा मुळे, अनिता जगताप, विवेक होळसमरे,पताळे सग्राम, मुरलीधर बिरादार,अंकुश हुंडेकर, कालिदास बिरादार, दत्ता पाटील, धनाजी बिरादार, सुजित जाधव, जयवंत बिरादार, सुरेश शिंदे, रामदास माळेगावे आदीनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.