उदगीर
रेस्ट हाऊस लातूर येथे डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये सर्वानुमते एस एस न्यूज चॅनल चे संपादक तथा पत्रकार अजय भालेराव यांची नूकतीच डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या अहमदपूर तालूकाध्यक्ष पदी तर गणेश मुंडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील जेष्ठ संपादक तथा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते नुकतेच त्याना नियुक्ती पत्र देण्यात आले.तसेच तालूका सचिव पदी पत्रकार भिमराव कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
डिजीटल मिडीया संपादक पत्रकारांच्या अडी अडचणीवर मात करत संघटनेच्या धैय्य धोरणानुसार सर्वांना सोबत घेवून पूढील काळात काम करणार असल्याचे अजय भालेराव यांनी या वेळी सांगीतले.या निवडी बद्दल अजय भालेराव आणी गणेश मूंडे व भिमराव कांबळे त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
