वाषिॅक स्नेहसंमेलन उत्साहात सपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर ही शैक्षणिक पंढरी आहे. उदगीर शहराचा शैक्षणिक दर्जा वाढीस लागावा, यासाठी विविध शाळा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये खतनाम शाळांच्या बरोबरीने नव्याने शैक्षणिक क्षेत्रात उतरलेल्या रेनबो पब्लिक स्कूलने देखील आपला हातभार लावला आहे. विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणाली राबवत विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू समजून विविध उपक्रम राबवले जात आहेत ही कौतुकाची बाब आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ही देखील कौतुकाची बाब आहे. असे विचार राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरात देगलूर रोड येथील राधे कृष्ण नगर येथे असलेल्या रेनबो पब्लिक स्कूल च्या स्नेहसंमेलन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. शाळेच्या क्रिडागंनात मोठ्या उत्साहात उद्घाटन सोहळा सपन्न झाला.
स्नेहसंमेलनाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे माजी क्रिडा व युवक कल्याण मंञी आ. संजय बनसोडे यांच्या शुभ हस्ते सपंन्न झाले.
या वेळी माजी क्रिडा व युवक कल्याण मंञी आ. संजय बनसोडे यांचा श्री.संत बंडी महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनोद गुरमे व शाळेच्या प्राचार्या सौ. अनुराधा गुरमे तसेचं संस्थेचे पदाधिकारी , शाळेतील सर्व शिक्षक, व शिक्षेकत्तर कर्मचारी यांच्या वतीने आ.संजय बनसोडे यांचा शाॅल , श्रीफळ,पुष्पगुच्छ, गुलाबाच्या फुलाचा मोठा हार, ट्राॅफी देऊन भव्य सत्कार केला गेला.
या वेळी कार्यक्रमांचे उदघाटक आ. संजय बनसोडे यांनी रेनबो पब्लिक स्कूल मध्ये राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांचा आणि विद्यार्थी हिताच्या आधूनिक व नवनवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन राबवण्यात येत असलेले कार्यक्रम यांचे कौतुक केले. शाळेच्या वतीने अनेक स्पर्धा घेतल्या जातात , उत्तम प्रकारे शिक्षण दिले जाते, या शाळेत दर्जेदार शिक्षण देण्यत येते, शहरात कमी कालावधीत नावलौकीक झालेली शाळा पाहावयास मिळाली आहे असेही गौरव उद्गार काढले,
शाळे च्या प्रगतीसाठी मी उदगीर मतदार संघाचा आमदार या नात्याने रेनबो पब्लिक स्कूल या शाळेला लागेल ते सहकार्य व मदत करेन असे आश्वासनही संजय बनसोडे या प्रसंगी दिले.
तसेचं येथे उपस्थित असलेल्या पालकांना, विद्यार्थ्यांना या वेळी आ.संजय बनसोडे यांनी शुभेच्छा दिल्या.
या वेळी बालकांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर केले यामध्ये देश भक्तिपर गीतावर, भावगीत,कोळी गीत, गणपती गीत,वेलकम गीत ,नाटके, अशा अनेक गाण्यांवर तसेचं मोबाईलचे फायदे व तोटे हे नाटक सादर केले. बालकांनी आपल्या कला कौशल यांनी सर्वाची मने जिकली .
या वेळी व्यासपीठावर उदगीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीणजी सुरडकर , भारतीय जनता पाटीॅचे नेते विनायकरावजी बेंबडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष प्राचार्य प्रवीण भोळे , डाॅ.अजयजी सोनटक्के , सय्यद जानीमिय्या , उदयजी ठाकूर, केंद्र प्रमूख बालाजी धमनसूरे , प्राचार्य: सत्यवान भोसले, यशवंत बिरादार, शिवशंकर पाटील, उमाकांत मटके, बाबासाहेब पाटील, प्राचार्य श्रीपाद सिमंतकर, नंदकुमार पटने, प्रा.जावेद शेख, दत्ता पाटील, गजानन बोतीकर, स्वप्निल मेडेवार, संस्थेचे संचालक धनंजय चेवले,चंद्रकात चामवाड इत्यादी मान्यवर व पालक तसेचं विदयाथीॅ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक संस्थेचे अध्यक्ष विनोद गुरमे यांनी केले तर सुत्रसंचलन डि.एस.बिरादार व प्रा.वर्षा मुस्कावाड यांनी केले. आभार प्राचार्या अनुराधा गुरमे यांनी मांडले .
कार्यक्रमासाठी शिवाजी मानकोळे, शाहीजी माने,दत्ता पाटील,संजय कंचे, हनमंत सगर,हूशन शेख यांनी परीश्रम घेतले.

