पुणे (प्रतिनिधी)
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, जे पी. नाईक कोथरूड,पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असून आपल्या सर्वांसाठी उर्जास्त्रोत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी आपण प्रत्येकांनी योगदान द्यावे, ही प्रत्येक भारतीयांची इच्छा आहे. जे पी नाईक या भव्य व प्रशस्त शैक्षणिक दालनात विविध उपक्रमातून शिवजयंती साजरा करण्यात आली.
उत्साहपूर्ण वातावरणात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कुचिपुडी नृत्य अभिनयातून गायत्री आंबेकर यांनी झुलवा पाळणा.. पाळणा..बाळ शिवाजीचा या नृत्याचे सादरीकरण केले.श्रीमती पल्लवी आपटे यांनी महाराजांच्या गौरवाचा गोंधळ गीत तर डॉ. कावेरी राऊत यांनी राजमुद्रा व शिवरायांचे गीत व राजेंद्र बनसोडे यांनी 'महाराष्ट्र गीत'सादर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ अधिव्याख्याता डॉ.गिताजंली बोरुडे विभाग प्रमुख बालशिक्षण,नवभारत साक्षरता विभाग एसीआरटी
पुणे तर प्रमुख पाहुणे जेष्ठ अधिव्याख्याता डॉ.दत्तात्रय थिटे विभाग प्रमुख एसीआरटी पुणे यांची उपस्थीती लाभले. मंचावर मोहन भोजापूरे, डॉ.सुमेधा ठाकूर,शंकर शहाणे, प्रा.शशांक जोशी, प्रा रंगराव पाटील, पल्लवी आपटे यांची मंचावर उपस्थिती होते.मा
डॉ. बोरुडे यांनी शिवाजी महाराजांना वंदन करून उपस्थितांना ‘शिवजयंती’ च्या शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात शिवाजी महाराजांची दूरदृष्टी कशी होती, हे ओघवत्या शैलीत मांडले. महाराज स्वत:साठी नाही तर रयतेसाठी जगले. महाराजांनी अठरा पगड जातींचा विचार केला. स्त्रीचा सन्मान करुन त्यांचे रक्षण केले.आज रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या महाराजांचे विचार भावी पिढीला देऊन त्यांचे विचार नवीन शैक्षणिक धोरणात रुजवण्या साठीचे प्रयत्न करावेत.असे मत मांडले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण, त्यांची धर्मनिरपेक्षता, शिकवण, व्यवहारचातुर्य, राज्याभिषेक, राज्यारोहण आदी विविधांगी पैलूंवर डॉ. दत्तात्रय थिटे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शंकर शहाणे,रंगराव पाटील,चलमले, प्रमोद राऊत, अखलाक शेख,यशवंत खाकरे, यांनी छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनातील विविध पैलूवर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किरण देवरे यांनी केले तर आभार दिलीप ढाकणे यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता श्रीमती अवंती काटे यांच्या पोवाडा नृत्य नाटिकेतून करण्यात आली.
