डोंगरशेळकी (एल.पी.उगीले) :- मराठवाड्याचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या तिर्थक्षेत्र डोंगरशेळकी ता. उदगीर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या कार्यालयात नुकतिच बैठक संपन्न झाली. या बैठकीत सोसायटीचे चेअरम हणमंत मुंडे व व्हाईस चेअरमन ज्ञानोबा गुरमे यांनी आपल्या पदाचे कांही दिवसांपूर्वी राजीनामे दिल्याने या दोन्ही पदाची नव्याने निवडणूक घेण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी ए. आर . नांदापूरकर यांच्याकडे चेअरमन पदासाठी बालाजी नागनाथ मुंडे तर व्हाईस चेअरमन पदासाठी सौ सुनिता ज्ञानोबा शेळके यांचे असे दोनच अर्ज आल्याने व वेळ संपल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ए . आर. नांदापूरकर यांनी दोन्ही पदाची निवड बिनविरोध झाल्याचे जाहिर केले .
या वेळी सोसाठीचे सर्व संचालक उपस्थित होते . निवडी नंतर ग्रामस्था तर्फे नूतून चेअरमन बालाजी नागनाथ मुंडे व व्हाईस चेअरमन सौ . सुनिता ज्ञानोबा शेळके यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला .
यावेळी सर्व सोसाटीचे संचालक हणमंतराव शेळके . ज्ञानोबा गुरमे, दत्तात्रय मुंढे, तुकाराम मुंडे , अजय कुलकर्णी, भामाबाई मुंडे, सागरबाई सुर्यवंशी ,नामदेव खंदाडे, विजया पवार,मुरलीधर पुंड उपस्थित होते . या वेळी निवणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.आर. नांदापूरकर यानी काम पाहिले, तर त्यांना गट सचिव जनार्दन शिंदे व अण्णाराव फट्टे यांनी सहाय्य केले . या वेळी ग्रामस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार केला . या वेळी माजी सरपंच ज्ञानोबा मुंढे,मावळते चेअरमन हणमंतराव मुंडे, मावळते व्हाईस चेअरमन ज्ञानोबा गुरमे,शिक्षण प्रेमी बाबुराव मुंढे गुरुजी, सुभाष सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
.jpeg)
