देवणी
देवणी -- महात्मा फुलेनगर येथील महानायक चॅरिटेबल ट्रस्टने संत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष रवी डोंगरे, उपाध्यक्ष अरुणा डोंगरे, सचिव प्रशांत शिंदे, कोषाध्यक्ष रोहित डोंगरे आणि सदस्य राहुल कांबळे, राम डोंगरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात संत गाडगे महाराजांच्या जीवनावर आणि कार्यावर प्रकाश टाकण्यात आला आणि त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याचे आले तसेच संत गाडगेबाबा महाराज प्रतिमेचे पूजन पत्रकार लक्ष्मण रणदिवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले, या कार्यक्रमास महिला पुरुष युवक अनेक कार्यकर्त्यांची उपस्थित होती
