देवणी लक्ष्मण रणदिवे
गुत्ती -- राष्ट्रीय सेवा योजना उज्वल ग्रामीण महाविद्यालय , घोणसी आयोजित विशेष युवक शिबिर 2024 -25 च्या चौथ्या दिवशी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व लोकसेवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, किन्नी यल्लादेवी यांच्या संयुक्त विद्यमाने नशाबंदीचा प्रचार प्रसार कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत शिबिरात समाविष्ट असलेल्या स्वयंसेवकाने हातामध्ये नशाबंदीचे पोस्टर्स घेऊन प्रचार रॅली काढली व गावभर नशाबंदीचा प्रचार प्रसार केला. त्यानंतर सर्व शिबिरार्थी व गावकऱ्यांना व्यसन मुक्त समाज निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. हे मार्गदर्शन नशाबंदी मंडळाचे लातूर जिल्हा संघटक प्रा. डॉ. विष्णू कांबळे यांनी केले व उपस्थित जनसमुदायास व्यसनमुक्तीची शपथ दिली. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी रा. से. यो. कार्यक्रमाधिकारी डॉ. सचिन घुगे आणि सर्व स्वयंसेवकाने अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा. से. यो. स्वयंसेविका अनुराधा इंगोले यांनी केले व आभार स्वयंसेवक अविनाश कोकणे यांनी मांडले.
