Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंच,सदस्य यांच्या मासिक भत्त्यात वाढ करा,




अंगणवाडी कार्यकर्ती ‌ मदतनीस या अर्जाचे मुदतवाढ‌ वाढवावी


देवणी लक्ष्मण रणदिवे 


देवणी - मानवी हक्क अभियान 

प्रत्येक गावात शासनाने गाव विकास घडवुन आणण्यासाठी स्थानिक ग्रामविकास संस्था निर्माण केले त्या संस्थेला आपण ढोबळ भाषेत ग्रामपंचायत म्हणत असतो,ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील व्यक्तीच्या निवडी केल्या जाऊन सरपंच,उपसरपंच,सदस्य आसे स्थान दिले जाते यांच्या व प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांच्या संयुक्त कारभारातुन गावातील आरोग्य,सुरक्षा,विकास,कार्य घडवून आणले जाते,यात स्थानिक कारभारात आसलेल्या ग्रामपंचायतीच्या कारभारात आसलेल्या सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना गाव कारभारात बराच वेळ दिला जातो,त्या वेळेचा मोबदला भरीव पध्दतीत दिला जात नाही,तसेच शासनाकडून अंगणवाडी कर्मचारी भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे,सदर झालेल्या भरतीची माहिती ग्रामीण महिलाना वेळेत मिळत नसल्याने त्यांची कुचंबना होते म्हणुन ग्राम पंचायतचे सरपंच, उपसरपंच,सदस्य यांच्या भत्त्यात भरीव वाढ करण्यात यावी, अंगणवाडी कर्मचारी यांच्या भरतीची मदत वाढ करण्यात यावी अशी महत्वपूर्ण मागणी मानवी हक्क अभियानाचे लातुर जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मण रणदिवे व देवणी तालुका अध्यक्ष गजानन गायकवाड यांनी गटविकास अधिकारी देवणी यांच्याकडे केली आहे,या मागणीला मानवी हक्क अभियानाचे मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख अर्जुन जाधव,लातुर जिल्हा सचिव मारुती गुंडीले,जळकोट ता.आध्यक्ष संग्राम घुमाडे,जळकोट ता.कार्यध्यक्ष मारुती नामवाड,जळकोट ता.संघटना समन्वयक अविनाश तोगरे,निलंगा तालुका अध्यक्ष शिवराज गुराळे,शिरुर आनंतपाळ ता.आध्यक्ष गणेश कांबळे, इत्यादींनी दिले असुन या मागणी मुळे ग्रामपंचायत गाव स्थरातील नागरिकां कडुन कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.