उदगीर (एल. पी. उगिले)
चाकूर अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटीला अर्थात पतसंस्थेला पाच ते दहा कोटी गटातील नागरी पतसंस्थाना उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दिला जाणारा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
कोल्हापूर येथील अविज पब्लिकेशन या संस्थेच्या मार्फत महाराष्ट्रभरातील नामांकित, विश्वासार्ह पतसंस्थांना हा पुरस्कार दिला जातो. सन 2023 - 24 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल बँक ऑफ ब्लू रिबन पुरस्कार या पतसंस्थेला देण्यात आला आहे. आंबी होली सिटी लोणावळा येथे प्रधान करण्यात आलेल्या पुरस्काराचा स्वीकार चाकूर अर्बन सोसायटीचे चेअरमन युनूस मासुलदार यांनी माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते स्वीकारला आहे. ग्रामीण भागातून अत्यंत दर्जेदार पद्धतीची बँकिंग सेवा देणारी ही पतसंस्था फक्त चाकुरच नव्हे तर संपूर्ण लातूर जिल्ह्यात नावलौकिक झाली आहे.
या पुरस्कारासाठी अशोक नाईक, अविनाश गुंडाळे इत्यादी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. सहकार क्षेत्रात चाकूर अर्बनचे कार्य अत्यंत उल्लेखनीय असून हा पुरस्कार संस्थे च्या गुणवत्ता आणि कार्यक्षमतेचा गौरव ठरला असल्याचे चाकूर अर्बनचे चेअरमन युनुस मासुलदार यांनी सांगितले आहे. या बँकेचे चेअरमन युनूस मासूलदार, शाखा अधिकारी अविनाश सुरनर, गणेश हंकारले, प्रशांत महाजन, आत्माराम डाके, रजाक मासूलदार, अशोक शेळके, यांनी उमाकांत फुलारी, नाना डाके, दत्तात्रय सूर्यवंशी इत्यादींनी हा पुरस्कार स्वीकारला आहे.
चाकूर अर्बनने उत्कृष्ट कार्य प्रदर्शन आणि ग्राहकांना दर्जेदार सेवा दिल्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. संस्थेच्या पुढील प्रगतीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे चेअरमन युनूस मासूलदार यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमाला विविध सहकारी बँकिंग क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांची उपस्थिती होती. पुरस्कार मिळाल्याबद्दल चाकूर अर्बनचे लातूर जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे. सर्व कर्मचारी आणि प्रशासकीय बोर्डाचेही कौतुक केले जात आहे.
