वाढवणा पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी दुपारी अंदाजे एक ते सव्वा एकच्या दरम्यान जळकोट - उदगीर रस्त्यावर नावंदी पाटी ते पिंपरीच्या दरम्यान अज्ञात वाहन चालकाने मोटार सायकल (क्रमांक एम एच 24 एल 3907) या वाहनास पाठीमागून जोराची धडक दिली, त्यामुळे बाबुराव गुंडप्पा कुमठेकर राहणार नळगीर हे मरण पावले असून त्यांच्यासोबतचे दुसरे सह प्रवासी सुधीर कपलापुरे हे गंभीर जखमी झाले आहेत. सदर वाहन हे अपघात करून पळून गेले आहे.
सदरचा रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग असून वरदळीचे आणि रहदारीचे ठिकाण आहे. अपघात हा दुपारच्या वेळी झालेला आहे. अपघाताच्या वेळी बरीच वाहने या रस्त्यावरून ये जा करताना दिसून येत आहेत. अपघात घडते वेळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी पाहिला असण्याची शक्यता आहे. सदरचा अपघात होताना किंवा झाल्यानंतर वाहन पळून जाताना कोणी पाहिले असल्यास, त्यांनी पोलीस स्टेशन वाढवणा येथे माहिती कळवण्याचे आवाहन पोलीस स्टेशन वाढवणा यांच्या वतीने करण्यात येत आहे. सदर अपघाताबाबत माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देऊन त्यांचा सत्कार केला जाईल. अपघाताबाबत काही माहिती असल्यास खालील मोबाईल क्रमांकावर फोन करून माहिती कळवावी.
* संपर्क क्रमांक टी. इ. कोरके पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन, वाढवणा 7219002018
* बी एस गायकवाड प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन, वाढवणा 9823707988
*
