Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बाराहाळी येथे शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका केंद्राचा शुभारंभ


   


                     

 बाऱ्हाळी (प्रताप देवरे/ अंकोश चिंचलवाड)

 बाराळी येथे कालवश अर्जुन मामा निवळीकर यांच्या प्रथम पुण्य स्मृतीदिनानिमित्त श्री संत कैकाडी महाराज प्राथमिक शाळा, प्रकाश नगर, बाऱ्हाळी येथे या संस्थेकडून  विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका केंद्र सुरू करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील बाऱ्हाळी हे गाव शिक्षणाचे हब मानल्या जाते, या गावात अनेक विद्यालय आहेत व प्राथमिक शाळा आहेत. नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा यासारख्या अनेक परीक्षा विद्यार्थी पास होतात. त्यामुळे पुढील शिक्षणामध्ये परिवर्तन आणण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी रुची आणावी व आवड निर्माण व्हावी,  यासाठी बालाजी अर्जुन निवळीकर यांनी अभ्यासिका कार्यालय विद्यार्थ्यासाठी उभा केले आहे, अशा अभ्यासिका केंद्रामुळे या परिसरातील 35 खेडे, बावन  तांड्यातील शेकडो विद्यार्थी एमपीएससी, यूपीएससी तसेच उच्चशिक्षित मुलासाठी व आय ए एस अधिकारी होण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, या उद्देशाने अभ्यासिकासाठी लाखो रुपये खर्च करून शहराकडे जातात त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागते. त्यामुळे पालक व मुले निराश होतात. परंतु अभ्यासिका केंद्र  गावातील या ग्रामीण भागामध्ये सुरू  झाल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल, अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे वळतील, असे अभ्यासिका शुभारंभ प्रसंगी गट शिक्षण अधिकारी मुखेड कैलास होन धरणे यांनी बोलताना सांगितले की, या  अभ्यासिका कार्यालयामुळे  अनेक गोर गरीब विद्यार्थी अधिकारी होऊ शकतात , पुस्तक वाचल्यानंतर  विद्यार्थ्याच्या मस्तकामध्ये बदल घडून येतो .

त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे प्रयत्न केले पाहिजेत.या  बाराहळीतील अभ्यासिका कार्यालयाचे पुस्तक वाचून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पुढील लाभ घ्यावा, 

या  अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन प्रसंगी बाराळीतील अनेक मान्यवरांचे पुष्पहार घालून  स्वागत करण्यात आले, या कार्यक्रमातील उपस्थित कार्यकर्ते  राजन देशपांडे , शेखर देशमुख, हनुमंत मामा वाडीकर, संचालक विजयाताई देशपांडे, शेषराव चव्हाण, धोंडीराम पाटील अस्वले, व प्रमुख पाहुणे अमोल इंगळे महाव्यवस्थापक नांदेड, दत्तात्रय मठपती शिक्षण उपसंचालक लातूर. शिरपत वाडीकर केंद्रप्रमुख बाराळी, मुख्याध्यापक शिवशेटे सर, मुक्रमाबाद पोलीस ठाण्याचे एपीआय भालचंद्र तिडके , संचालक बालाजी निवळीकर व  सिद्धार्थ निवळीकर,  शाळेतील विद्यार्थी, कर्मचारी , अधिकारी कार्यकर्ते व पत्रकार , तसेच गावातील नागरिक  यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.