देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी: गेल्या तीस वर्षांपासून शरद जोशी च्या नेतृत्वात शेतकरी संघटनेत अत्यन्त प्रतिकुल परस्थिती असतानाही संघटनेत टिकून काम करून शेतकरी चळवळच्या पडझडीच्या काळात लातूर जिल्हा प्रमुखाची जबाबदारी घेऊन शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलन करून शेतकरी चळवळ जिवंत ठेवण्याच काम केले. याच कामाची दखल घेऊन भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकेत यांच्या आदेशावरून भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय महासचिव राजवीर सिहं जादौन यांनी आज दिनांक १३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय कार्यालयातून निवडीचे पत्र देऊन निवड जाहीर केली आहे. राजकुमार सस्तापुरे सारखा एका सामान्य कुटूंबातील सामान्य कार्यकर्तेयाल्या भारतीय किसान युनियनने महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता ही जबाबदारी दिल्यामुळे शेतकरी चळवळीत व सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या त्याच्या मित्र परिवारात आनंदाच वातावरण आहे
