देवणी लक्ष्मण रणदिवे
उदगीर तालुक्यातील शेल्हाळ या गावातील मातंग समाजातील असणारा कठीण परिस्थितीतून शिक्षण घेऊन आई-वडिलांनी त्यांना दिवसाचं रात्र करून चांगलं शिक्षण देऊन आई बायना कांबळे वडिल तानाजी कांबळे ,आईचा व्यवसाय टेलरिंग व वडीलाचा व्यवसाय सेंट्रींगचे काम करून मुलाचे शिक्षण पूर्ण केले आहे मुलगा जिद्दी असल्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत मी नोकरी लावून घेणार आसे शब्द पाळले बलजीत तानाजी कांबळे मुलाचे शिक्षण पूर्ण करून त्यांना एक चांगल्या पदावर नोकरी मिळावी ही अपेक्षा होती बलजीत तानाजी कांबळे यांची निवड सीआरपीएफ मध्ये निवड झाल्यामुळे आई-वडिलांमध्ये आनंदाचे अश्रू डोळ्यातून पाहायला मिळत आहे परंतु मुलाने आई वडीलाकडे लक्ष ठेवून आई वडिलांना कुठलाही त्रास होऊ देऊ नये अशीच आई-वडिलांची माया असते जवळचे नातेवाईक उद्धव गायकवाड वलांडी,अमोल गायकवाड ,देवणी तालुक्यातील सर्व मातंग बांधव असणारे उदगीर तालुक्यातील मातंग बांधव व मानवी हक्क अभियान संघटनेचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे व सर्व संघटनेचे पदाधिकारी सर्वांनी अभिनंदन केले आहे
