देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुका सह लातूर जिल्हा सह मानवी हक्क अभियान लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांच्याकडून ग्राहक संरक्षण संस्थेच्या उदगीर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माझ्या प्रेम मित्रांना मनापासून हार्दिक स्वागत लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या उदगीर तालुकाध्यक्षपदी सुनिल पांडुरंग सुतार यांची राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर आमकर यांनी नुकतीच निवड केली.
लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था ही संस्था भारतभर ग्राहक संरक्षणाचे काम करीत आहे. त्यामध्ये उपभोक्ता संरक्षण कल्याण अधिकाराच्या माध्यमातून उदगीर तालुका कार्यक्षेत्रामध्ये काम करण्यासाठी सुनिल सुतार यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ग्राहक संरक्षण कायदा याविषयी त्यांनी प्रबोधन आणि जानजागृती करावी म्हणून त्यांना भारतीय अन्न महामंडळाचे सदस्य, लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिपक तांबे व जिल्हाध्यक्ष संग्राम वाघमारे यांच्या शिफारशीनूसार राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर आमकर यांनी मुबंई येथे
नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड केली.सुतार यांना मुंबई कार्यालयात निवडीचे पत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुतार यांना उदगीर तालुका आणि गाव पातळीवर पदाधिकारी निवड करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष महिला आघाडी सुप्रिया सुवे, राष्ट्रीय उपाध्यक्ष दिपक तांबे, राज्य महिला आघाडी उपाध्यक्ष कांचन वाघमारे, लातूर जिल्हाध्यक्ष संग्राम वाघमारे, चाकूर तालुका अध्यक्ष पांडुरंग साळुंके आदिजण उपस्थित होते. सुतार यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
