देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील महादेववाडी येथे देवणी कृषी विभागाने उपक्रम येथे"आत्मा" अंतर्गत "रब्बी हंगाम- किसान गोष्टी "कार्यक्रमाचे महादेव वाडी येथे शेतकरी मेळाव्यामध्ये प्रगतशील शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या पिकांच्या यशोगाथा कथन-शेतकऱ्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी. राहुल जाधव बी टी एम देवणी.महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या "आत्मा "योजनेअंतर्गत मौजे महादेव वाडी येथे" रब्बी हंगाम किसान गोष्टी कार्यक्रम" आणि "डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन "योजनेअंतर्गत सेंद्रिय गटातील शेतकऱ्यांचे" गाव पातळीवरील प्रशिक्षणाचे" यशस्वी आयोजन करण्यात आले.प्रकल्प संचालक आत्मा एस व्ही लाडके आणि उपसंचालक श्रीमती बांगर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका कृषी अधिकारी श्री कृष्णा मुंडे यांच्या नियोजनाने रब्बी हंगामातील वेगवेगळ्या पिकांचे व कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना घेऊन यशस्वी योगदान दिलेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा शेतकऱ्यापर्यंत त्यांच्या बांधावर पोहोचाव्यात या हेतूने रब्बी हंगाम किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री पांडुरंग चामे मुख्य मार्गदर्शक म्हणून रावणगाव येथील प्रगतिशील शेतकरी श्री भीमराव डोंगापुरे हे होते. व्यासपीठावर दुग्ध व्यवसाय व पशुपालन पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री राजपाल बिरादार, प्रशांत पाटील धवन हिप्पर्गेकर, एस एस पी चे तालुका प्रतिनिधी जुबेर पठाण राहुल जाधव श्रीमती माया श्री नामे कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार विजेते शेतकरी ओमकार मसकल्ले, संगमेश्वर पताळे शरद बिरादार महेश शिरपुरे, इत्यादी शेतकरी उपस्थित होते. तालुक्यातील पहिले कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार प्राप्त विजेता शेतकरी श्री ओमकार मस्कले व सौ सुनीता मस्काल्ले यांचा महादेव वाडी आणि दवन हिप्परगा ग्रामपंचायतच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.देवणी तालुक्यातील वेगवेगळ्या कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांमधून यशस्वी शेतकऱ्यांनी स्वतःची यशोगाथा शेतकऱ्यासमोर उपस्थित केली जेणेकरून यशस्वी ज्ञानाचे मार्गक्रमण शेतकरी टू शेतकरी होण्यास व्यासपीठ उपलब्ध झाले याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक श्री भिमराव डोणगापुरे यांनी शेतीला पूरक व्यवसाय असावा व शेती तंत्रज्ञानावर आधारित असावी जेणेकरून शेतीचे उत्पन्न दुप्पट होईल याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून तुर हरभरा सोयाबीन इत्यादी पिकाच्या वेगवेगळ्या अधिक उत्पादन देणाऱ्या प्रजातीचे मार्गदर्शन करून महिला शेतकऱ्यांनी शेतीमध्ये सहभाग वाढवावा जेणेकरून शेती नफ्याची होईल याबाबत मार्गदर्शन केले. प्रगतिशील शेतकरी श्री प्रशांत पाटील दवन हिप्पर्गेकर यांनी शासनाची डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजना अतिशय उपयुक्त असून शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवून सेंद्रिय उत्पादन घेऊन कुटुंबाचे आरोग्य समाजाचे गावचे एकंदरीत सर्वांचेच आरोग्य निरोगी ठेवण्यात मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राहुल जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती माया श्री नामे यांनी केले.
