देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी येथील बोरोळ चौक येथे सकल हिंदू संघटनेच्या वतीने बांगलादेशी हिंदूच्या मानवाधिकार, मालमत्ता आणि जिवाचे संरक्षण करण्यात यावे यासाठी तहसीलदार यांना दि. १० डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले. देवणी शहरातील परिसरातील सर्व हिंदू संघटना बोरोळ चौक येथे एकत्र येऊन बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या आमाणूष आत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू संघटना आक्रमक होत बांगलादेश सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या, तसेच संबंधित घटनेचा निषेध करून यावेळी शहरातील सर्व व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन बांगलादेश येथील हिंदूवर होत असलेल्या घटनेचा तिव्र निषेध करून या आंदोलनात व्यापारी सहभागी झाले होते. यावेळी विविध हिंदू संघटना व हिंदू बांधव मोठ्याया धरणे आंदोलनात वैजनाथ अश्टुरे,गोविंद दोडके, उद्धव मल्लेशे, मनोहर पाटणे, सोमनाथ लुल्ले, ज्ञानोबा माऊली, अटल
धनुरे, प्रशांत पाटील दवणहिप्परगेकर, काशिनाथ गरिबे, दिलीप मजगे, सोमनाथ कलशेट्टी, प्रशांत पाटील जवळगेकर, विजयकुमार मुक्के, शंकर जीवने, अमर पाटील, रमेश मंसुरे, शिवाजी महानूर, सूर्यकांत सह्याद्री, रघुवीर सावंत महाराज, बालाजी बिरादार, हनुमंत बिरादार, राजीव गुणाले, प्रशांत पाटील, बालाजी सूर्यवंशी, स्वप्निल बावगे, गणेश बोंद्रे, ईश्वर पाटील ,आकाश संते पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
