देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी मागासवर्गीय वसतिगृह, देवणी या ठिकाणी शालेय शिक्षण घेत असलेल्या इयत्ता बारावी वर्गातील विद्यार्थ्यांसोबत महादेव कोटे यांनी संवाद साधला त्यामध्ये मुलांच्या नेतृत्व कौशल्य व तसेच संवाद कौशल्य वाढवण्यासाठी त्यांच्याशी त्यांच्या करिअर डेव्हलपमेंट याविषयी चर्चा करण्यात आली व तसेच संविधानाला अभिप्रेत असलेलं समाज घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये युवकांनी सक्षम भूमिका घेतली पाहिजे अशा स्वरूपामध्ये संविधान समजून घेणे आजच्या युवकांची गरज आहे म्हणून संविधानाविषयी जागरूकता आणण्यासाठी संविधानाचे मार्गदर्शक तत्वे व मूल्य याचे पोस्टर्स प्रदर्शन लावून सार्वभौम समाजवाद स्वातंत्र बंधुता समानता सामाजिक न्याय या मूल्यांना घेऊन युवकांचे मूलभूत कर्तव्य त्यामध्ये धर्म स्वतंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मूल्यांचा अभ्यास व माहिती व्हावी व तसेच संविधानाचे कायदे व कलम यामध्ये युवकाचे समज वाढावे यासाठी संविधानाची पोस्टर प्रदर्शन लावून माहिती देण्यात आली. या कार्यशाळेला तालुक्यातील विविध गावातील 37 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यावेळी विद्यार्थ्यांनी अनुभव शिक्षा केंद्राचे आभार मानले.
